शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये रुग्ण तपासणीसाठी थर्मल गन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

तालुक्यात १८० गावे व १२० ग्रामपंचायती आहे. लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. ग्रामीण भागातील साडेतीन लाख जनतेसाठी सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या सर्व ठिकाणी ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. शहरातील दीड लाख नागरिकांसाठी उपजिल्हा रूग्णालय व वसंतनगर आणि गढीवॉर्ड येथे ‘नागरी आरोग्य केंद्रात फिवर क्लिनिकची उभारणी केली आहे.

ठळक मुद्दे‘कोराना फिवर क्लिनिक’ : २० दिवसांत तापाच्या ३६० रुग्णांची तपासणी

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यात नऊ ठिकाणी ‘कोरोना फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. आता तापाच्या रुग्णांच्या झटपट तपासणीकरिता अद्ययावत ‘थर्मल गन’ बोलाविण्यात आल्या. गेल्या २० दिवसांत या फिवर क्लिनिकमध्ये एकूण ३६० तापाचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.तालुक्यात १८० गावे व १२० ग्रामपंचायती आहे. लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. ग्रामीण भागातील साडेतीन लाख जनतेसाठी सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या सर्व ठिकाणी ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. शहरातील दीड लाख नागरिकांसाठी उपजिल्हा रूग्णालय व वसंतनगर आणि गढीवॉर्ड येथे ‘नागरी आरोग्य केंद्रात फिवर क्लिनिकची उभारणी केली आहे.नऊ ‘फिवर क्लिनिक’मध्ये सर्दी, ताप, खोकला आदी आजारांची तपासणी ‘थर्मल गन’व्दारे करण्यात येत आहे. २८ एप्रिलपर्यंत ३६० तापाचे रुगण आढळले. २५ ते २८ एप्रिलपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांच्या मार्गदर्शनात ३२८ पैकी १० रुग्ण, जांबबाजार पीएचसीत डॉ. दीपक पोले यांच्या मार्गदर्शनात १५० पैकी १३ रुग्ण, चोंढीत डॉ. विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात २०२ पैकी तीन रुग्ण, फेट्रा पीएचसीत १०० पैकी ३ रुग्ण, बेलोरात डॉ. सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात १६५ पैकी १० रुग्ण, शेंबाळपिंप्री येथे डॉ. अनिल भावसार यांच्या मार्गदर्शनात ९१ पैकी दोन रुग्ण, वसंतनगर येथे डॉ. विद्या राठोड यांच्या मार्गदर्शनात २७ पैकी दोन, तर गढीवॉर्ड येथे डॉ. रवि वावधने आणि डॉ. सारिका नाईक यांच्या मार्गदर्शनात ३८ पैकी २ रुग्ण अशा एकूण ११८९ रुग्णांची तपासणी केली.यात एकूण ३६० तापाचे रुग्ण आढळले. त्या सर्वांना अ‍ॅन्टिबायोटिक औषधी देऊन उपचार करण्यात आले. त्यांना तूर्त घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. येथे ३१० बेडचे ‘डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ उभारण्यात आले असून आरोग्य यंत्रणा व तालुका प्रशासन सज्ज आहे.तालुक्यात अद्याप कोरोना पॉझिटिव्ह नाहीकोरोनाचा भविष्यातील वाढता धोका लक्षात घेऊन तयारी करण्यात येत आहे. ‘फिवर क्लिनिक’मध्ये ‘थर्मल गन’ने तापाचे रुग्ण तपासण्यात येत असून त्यामुळे रुग्णाला हात न लावता तापमान कळते. डॉक्टरांच्या वेळेची बचत होते. तापाच्या रुग्णांना पाच दिवसांची औषधी देऊन तिसऱ्या दिवशी चौकशी केली जाते. तालुक्यात एकही कोरोना पॉझीटिव्ह नसून नागरिकांनी घाबरु नये व नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, डॉ. आशिष पवार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल