शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

पावसाळ्यात चाहूल अन् अद्यापही नियोजन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:10 IST

‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणीचा अनुभव व्याकूळ यवतमाळकर सध्या घेत आहेत. भीषण पाणीटंचाईची चाहूल पावसाळ्यातच लागली असताना कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही.

ठळक मुद्देयवतमाळची पाणीटंचाई : सप्टेंबरनंतर निळोणात २४ आणि चापडोहत होते २० टक्के पाणी

ज्ञानेश्वर मुंदे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणीचा अनुभव व्याकूळ यवतमाळकर सध्या घेत आहेत. भीषण पाणीटंचाईची चाहूल पावसाळ्यातच लागली असताना कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही. आता संपूर्ण पाणी आटल्यानंतर विविध पर्याय पुढे आणले जात आहे. बेंबळाचे पाणी आणखी दूर असल्याने गोखीचा पर्याय पुढे आला. कोट्यवधींच्या नियोजनातून टंचाई ‘कॅश’ केली जात आहे. प्रशासनाच्या बैठकांमधून रोज नवे-नवे पर्याय पुढे येत असले तरी यवतमाळकर मात्र तहानलेलेच आहेत.यवतमाळ शहरात यंदा १९७१ पूर्वीच्या स्थितीची पुनरावृत्ती होत आहे. निळोणा धरण होण्यापूर्वी यवतमाळकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत होते. पाणी विकतही मिळत नव्हते, असे तो दुष्काळ अनुभवलेले वयोवृद्ध सांगतात. आता तशीच परिस्थिती पुन्हा यवतमाळात उद्भवली आहे. निसर्गाने सुरुवातीलाच पाणीटंचाईची चाहूल दिली होती. यवतमाळ तालुक्यात सरासरीच्या केवळ ४१.६५ टक्केच पाऊस झाला. संपूर्ण जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस यवतमाळात पडला. परिणामी यवतमाळला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प सप्टेंबर महिन्यापासूनच तहानलेले होते. निळोणा पावसाळ्यानंतर २४ टक्के आणि चापडोह प्रकल्पात केवळ २० टक्के जलसाठा होता. पाणी पुरणार नाही, यावर त्याचवेळी शिक्कामोर्तब झाले होते. परंतु याचा गांभीर्याने विचार ना जीवन प्राधिकरणाने केला ना प्रशासनाने. पाण्याचा अपव्यय सुरूच राहिला. परिणामी फेब्रुवारी महिन्यात जे व्हायचे तेच झाले. दोन्ही प्रकल्प तळाला लागले. मृत साठ्यावर तहान भागविण्याची वेळ आली.आॅगस्ट महिन्यातच पाणीटंचाईचे नियोजन सुरू केले असते तर आता नवनवीन पर्याय शोधण्याची गरज पडली नसती. बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी आरक्षित करण्यात आले होते. त्याच वेळी बेंबळा प्रकल्प ते जलशुद्धीकरण केंद्र अशी पाईपलाईन टाकली असतीतर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र सुरुवातीला पाणी आणण्याऐवजी यवतमाळ शहरातील गल्लीबोळात पाईपचे जाळे टाकण्यावर भर दिला. अख्खे यवतमाळ खोदून त्यात पाईप टाकले. मात्र या पाईपमध्ये येणारे बेंबळाचे पाणी मात्र कधी पोहोचणार हे कुणीच सांगत नाही. बेंबळा ते जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईनचे काम केवळ २५ टक्केच झाले आहे. त्यामुळे आता या पाण्याची आशा प्रशासनाने सोडली. काहीही केले तरी पावसाळ्यापर्यंत पाणी येणार नाही, हे पालकमंत्र्यांच्या बैठकीतही स्पष्ट झाले. त्यामुळे दुसरा पर्याय पुढे आला. तो म्हणजे गोखी प्रकल्पाचा.दारव्हा तालुक्यातील या प्रकल्पावरून यवतमाळच्या एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. जुनी पाईपलाईन भंगारात काढल्यानंतर आता नवीन पाईपलाईनसाठी सव्वा कोटी खर्चावे लागणार आहे. दररोज जलपातळी खालावत आहे. यवतमाळकर संयमाने पाणीटंचाईचा सामना करीत आहे. परंतु प्रशासनाच्या घिसडघाईने या संयमाचा बांधही फुटू शकतो.२० दिवसानंतर येणाऱ्या नळाच्या पाण्याचा अपव्यय सुरूचयवतमाळ शहरात प्रचंड खोदकाम झाल्याने जलवाहिनी ठिकठिकाणी फुटली आहे. १५ ते २० दिवसानंतर येणाऱ्या नळाचे बहुतांश पाणी वाहून जाते. शहराच्या विविध भागात पाण्याचे असे लोट वाहताना दिसतात. पाणीटंचाईच्या उपाययोजनेत वाहून जाणाऱ्या पाण्याचे कोणतेच नियोजन दिसत नाही. शहरातील गळती लागलेले पाईप दुरुस्त केले तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. तर दुसरीकडे काही मंडळी थेंबन् थेंब वाचवत पाणी बचतीसाठी धडपडताना दिसतात.