शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत.

ठळक मुद्दे५३ नागरिक होम क्वारंटाईनमधून बाहेर : संशयितांच्या संख्येत घट, आकडा आता १०१ वर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यानंतर १५ दिवसाचा कालावधी लोटला नव्याने एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. असे असले तरी धोका मात्र टळलेला नाही. खबरदारी म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही.जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत. यासाठी ५३ विविध उपाययोजनांचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. यातून १५८ लोक होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यावर १४ दिवस पाळत ठेवण्यात आली. कुठलीही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसली नाही. यामुळे ५३ व्यक्तींना क्वारंटाईन परिघाबाहेर काढण्यात आले. याशिवाय ज्या व्यक्तींचा निगेटीव्ह अहवाल आला होता, अशा व्यक्तींना आयसोलेशन वार्डातून बाहेर काढण्यात आले. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. जिल्ह्यातील या सर्व व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे. यामुळे क्वारंटाईन रुग्णांची संख्या १५८ वरुन १०१ वर आली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ही जमेची बाजू आहे. पॉझिटीव्ह रुग्ण जिल्ह्यात नव्याने दिसले नाही.आता जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या यंत्रणेने पुणे आणि मुंबई येथून जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात परतणाऱ्या व्यक्तींचा आकडा दहा हजारांवर असण्याचा अंदाज आहे. यातील तीन हजार व्यक्ती आरोग्य विभागापुढे आले आहे. त्यांच्यावर १४ दिवस लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोना विषाणूची बाधा रोखण्यासाठी शर्तीचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात प्रशासनाला सध्या यशही आले आहे. मात्र धोका अजून टळलेला नाही.जिल्हा पहिल्याच स्टेजमध्ये असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिला होता. ही स्थिती अशीच कायम राखण्यासाठी यवतमाळकरांकडून नियमांचे पालन होण्याची अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.मदतीसाठी पालकमंत्र्यांची हेल्पलाईनकोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामुळे गावाकडे निघालेले अनेक कामगार, प्रवासी अडकून पडले आहे. जिल्ह््याबाहेर अडकलेल्या अशा प्रवाशांना आता परत आणणे शक्य नाही ते आहे तिथेच मदत मिळावी या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी समन्वयाकरिता हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यात रोजमजुरीकरिता गेलेले कामगार, शिक्षणाकरिता गेलेले विद्यार्थी, नोकरदार अडकून पडलेले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस