शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस कर्मचाऱ्यांना फेस्टीव्हल अलाऊन्स नाही, केवळ पगारावरच भागवावी लागणार दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 18:09 IST

निवडणूक बंदोबस्ताचा ताण : वेळेपूर्वी पगार दिल्यामुळे कुटुंबीयांनी खरेदीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या पोलिसांना सण-उत्सव कधीच कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. त्याचा हा त्याग समाजात शांतता ठेवतो. यामुळे इतरांना बिनधास्तपणे सण-उत्सवाचा आनंद घेता येतो. जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या अडीच हजारांवर पोलिस कर्मचाऱ्यांना यंदा फेस्टीव्हल अलाऊंस मिळालाच नाही. या कर्मचाऱ्यांना वेळेअगोदर हातात आलेल्या पगारावरच दिवाळीचा सण साजरा करावा लागत आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या पूर्वी १२ हजार रुपये फेस्टीव्हल अलाऊन्स देण्यात येत होता. नंतर ही रक्कम वेतनातून कपात केली जात होती. तर कर्मचाऱ्यांना वार्षिक गणवेश भत्ता दिला जातो. याची पाच हजार रुपये रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येत होती. या सोबतच कर्मचाऱ्यांच्या शिल्लक राहिलेल्या रजेचीही रोख रक्कम दिली जात होती. 

या सर्व भत्यांचे नियोजन करून दिवाळीच्या सुरुवातीला हा पैसा पोलिस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात होता. वेळेअगोदर मिळालेला पगार आणि विविध भत्त्यांच्या स्वरूपात जमा झालेली ही रक्कम यातून पोलिस कुटुंबीयांना दिवाळी खरेदीचा आनंद घेता येत असे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरच घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी करण्याचे नियोजन या येणाऱ्या भत्त्याच्या भरवशावर केले जात होते. यंदा फेस्टीव्हल अलाऊन्स व गणवेश भत्ता पोलिसांना मिळाला नाही. यामुळे केवळ पगारातूनच दिवाळी खरेदी करावी लागत आहे. 

रजा रोखीकरणाची रक्कम वळती पोलिस कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगाराची रक्कम दिवाळी असल्याने २३ ऑक्टोबरपासूनच देण्यास सुरुवात झाली आहे. तर शिल्लक रजेचा रोख मोबदलासुद्धा देण्यात येत आहे. ही प्रक्रिया जिल्ह्यात राबविली जात आहे. टप्प्याटप्याने पोलिसांच्या खात्यात जमा होत आहे. आतापर्यंत जवळपास ७०० पोलिस कर्मचाऱ्यांना रजेच्या रोख मोबदल्याचा लाभ मिळाला आहे.

बँकांना सुटी असल्याने एकाच वेळी होत आहे सर्वत्र गर्दी सण-उत्सवाच्या काळात बँकांनाही सुटी असल्याने विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह शासकीय कर्मचारी आणि खासगी आस्थाप- नेतील चाकरमान्यांचीही बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. हीच गर्दी खरेदीसाठी बाजारपेठेतही पहावयास मिळत आहे. या गर्दीमुळे अनेकजण ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडताना दिसतात. विशेष करून युवा वर्ग याला प्राधान्य देतात.

टॅग्स :YavatmalयवतमाळDiwaliदिवाळी 2024