शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बेरोजगार भडकले; शिक्षक भरतीसाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 19:53 IST

Yawatmal News राज्य शासन शिक्षक भरतीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात २०१९ पासून लटकलेली शिक्षक भरती त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेरोजगारांनी दिला. 

 

यवतमाळ : राज्य शासन शिक्षक भरतीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात २०१९ पासून लटकलेली शिक्षक भरती त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेरोजगारांनी दिला. 

यासंदर्भात डीएड, बीएडधारक उमेदवारांनी शुक्रवारी सर्व जिल्हास्तरावरून राज्यशासनाला निवेदन पाठविले. यवतमाळ जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी हे निवेदन घेऊन बेरोजगारांचा जमाव एकत्र आला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत यावेळी शासनाला निवेदन देण्यात आले. फेब्रुवारी २०२३ मध्ये अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. पण अजूनही पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी रोष व्यक्त केला. ५५ हजार शक्षक पदांची भरती एकाच टप्प्यात करावी, विभागीय भरती करू नये, सर्व संवर्गातील उमेदवारांना आरक्षणनिहाय न्याय देण्यात यावा, २०१७ मधील अर्धवट राहिलेली भरती तत्काळ पूर्ण करण्यात यावी, न्यायालयात सादर केलेल्या रोडमॅपनुसार पवित्र पोर्टलला तत्काळ नोंदणी सुरू करावी, एकदा निवडलेला उमेदवार पोर्टलमधून पुढील निवडीसाठी बाद करण्यात यावा, उमेदवारांची प्रतीक्षा यादी लावावी, उर्दू माध्यमाच्या किमान तीन हजार जागा भरण्यात याव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आले. निवेदन देतेवेळी युनिक अकॅडमीचे सचिन राऊत, चेस स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रशांत मोटघरे, सुकेश काजळे, रुपेश काटकर, शुभम गावंडे, मुकेश झोडे, पवन देवतळे, प्रतिक लोखंडे, विशाल ठाकरे आदी उपस्थित होते. 

२३ जूनचा अल्टीमेटमशिक्षक भरतीची प्रक्रिया २३ जूनपर्यंत सुरू करण्यात यावी, असा अल्टीमेटम निवेदनातून देण्यात आला आहे. तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखण्यासह बेमुदत उपोषण, सामूहिक जलसमाधी, अर्धनग्न आंदोलन अशा स्वरुपाचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन