शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नकली बंदुकीच्या धाकावर दोघांनी केली लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला. टेंभी येथील दोघांनी आरडाओरड केली असता भामटे दुचाकीने पसार झाले. त्यानंतर भामट्यांनी महागावकडे पळ काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नकली बंदुकीचा धाक दाखवून दोन भामट्यांनी एका दुचाकीस्वाराला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फुलसावंगी ते महागाव दरम्यान घडली. पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून दोन भामट्यांना रात्री १.३० वाजता जेरबंद केले. राहुल बालाजी भालेराव (२०) आणि आकाश आत्माराम मिरासे अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील टेंभी येथील दोन इसम महागाव येथून गावाकडे परत जात होते. या दोघांना आरोपींनी भांब फाट्याजवळ अडवून बंदुकीचा धाक दाखविला. बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला. टेंभी येथील दोघांनी आरडाओरड केली असता भामटे दुचाकीने पसार झाले. त्यानंतर भामट्यांनी महागावकडे पळ काढला. वाटेत डॉ. अमर मोतेवार यांच्या निवासस्थानी किरायाने राहणाऱ्या सचिन कोनादे यांच्या बुलेटचे (क्र.एम.एच.२४/बी.एम.३८८०) हॅन्डललॉक आणि वायरिंग तोडली. त्यांनी बुलेट पळवून नेली. शेजाऱ्यांनी आरडाओरडा करताच भामटे सुसाट वेगाने पळून गेले. या भामट्यांनी या घटनेपूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास महागाव बसस्थानक परिसरात नकली पिस्तूल रोखून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घटनांची माहिती मिळताच उमरखेड येथे शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित ठाणेदार विलास चव्हाण यांनी लगेच महागाव गाठले. त्यांनी पोलीस पथकाला भामट्यांच्या शोधात रवाना केले. अवघ्या एका तासात हे भामटे सवना शिवारातील जंगलात आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून नकली बंदूक जप्त केली. दाेघांनाही पोलीस ठाण्यात आणून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डॉ. अमर मोतेवार यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून राहुल भालेराव व आकाश मिरासे यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची कसून चाैकशी सुरू असून इतर ठिकाणच्याही लुटमारीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता  आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू असून ठाणेदार विलास चव्हाण  यांनी सांगितले. हे भामटे नेमके कुठले याचाही शोध घेतला जात आहे. 

पोलीस अधीक्षक होते उमरखेडमध्ये ही घटना घडली त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उमरखेड आणि महागाव तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये शांतता समितीच्या बैठकीला उपस्थित होते. ठाणेदार चव्हाण यांनी डॉ. भुजबळ यांना माहिती देताच त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. महागाव पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना जेरबंद केले. 

आरोपींची कसून चौकशी सुरूयापूर्वीही तालुक्यात काही ठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या आहे. विशेष म्हणजे फुलसावंगी परिसरात या घटना घडल्या होत्या. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा नकली बंदुकीच्या जोरावर लुटण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Thiefचोर