शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'तालुका तिथे हेलिपॅड' योजनाच अडकली; इमर्जन्सी लँडिंग करण्याकरिता जागाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 18:18 IST

Yavatmal : दोन वर्षांत जिल्हास्तरावर एकही प्रस्ताव नाही

संजय भगतलोकमत न्यूज नेटवर्क महागाव : शासनाच्या हेलिपॅड धोरणाप्रमाणे प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅड करण्यासाठी नियोजन करून जागा निश्चित करण्याबाबत संचालक विमान चालन संचालनालय यांच्या १० फेब्रुवारी २०२२ च्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय ठिकाणी तहसीलदार यांना जागा निश्चित करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठवले होते. दोन वर्षांत जिल्हाभरातून एकही प्रस्ताव जिल्हास्तरावर दाखल झाला नाही. 'तालुका तिथे हेलिपॅड' योजनाच अडकली आहे.

महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे पुराच्या पाण्यामध्ये अनेक कुटुंबे अडकून पडली होते. या घटनेला २४ जुलै रोजी एक वर्ष होत आहे. नागरिकांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मात्र, इमर्जन्सी लैंडिंग करण्यासाठी हेलिपॅड नसल्यामुळे ऐनवेळेवर खडका येथे महामार्गावर हेलिकॉप्टर लैंड करण्यात आले. पायलटला लोकेशन मिळत नसल्यामुळे बराच वेळ मदतकार्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतरही या धोरणात्मक निर्णयाची अजूनही जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. अतिवृष्टीमुळे पूर बाधित क्षेत्रात जीवितहानी टाळण्यासाठी इमर्जन्सी लँडिंग करण्याकरिता तालुका तेथे कायमस्वरूपी हेलिपॅड निर्माण करण्याकरिता जागेची निश्चिती करण्याचे निर्देश तहसीलदार यांना देण्यात आले होते. या प्रस्तावाबाबत जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्यामुळे जिल्हाभरातून तहसीलदारांनी प्रस्तावच दाखल केले नाही.

नागरी विमान महासंचालनालयाचे नियम लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या परिशिष्ट पत्रात महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय २५ जानेवारी २०१८ राज्याचे हेलिपॅडबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड करण्यासाठी नियोजन जागा निश्चित करून त्याप्रमाणे अहवाल संचालक विमान चालन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत शासनास सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते.

आता तरी जाग येणार का?गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे. विशेष करून आनंदनगर भागामध्ये वर्षभरापूर्वी पूरस्थितीमुळे जीवितहानीचा प्रसंग ओढवला होता. हिवरा संगम भागामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. लागूनच नद्यांचा संगम असल्यामुळे नदीला आलेल्या पुराची नेहमी भीती असते. आता तरी प्रशासन तालुका तिथे हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्याला प्राधान्य देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ