शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

वीज कोसळली अन्‌ आई समोरच झाला मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 05:00 IST

दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिकांना त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी गजाननला मृत घोषित केले. मारूती विजेच्या धक्क्याने प्रचंड प्रभावित झाला असून त्याच्या उपचार सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करुंझा/झरी : पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली थांबलेल्या शेतमजुरांपैकी दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर   सहा जणांचा जीव वाचला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथे मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, या घटनेत आई समोरच २५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. विजेची आस लागल्याने मजुरांमधील एका मुलीचा पाय भाजला गेला. पाथरी येथील शेतात टोबणीचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली. विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. पाऊस आल्याने शेतात टोबणीचे काम करीत असलेल्या आठ जणांनी धुऱ्याला लागून असलेल्या झाडाचा आसरा घेतला. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली. यात अक्षय ऊर्फ बबलू गोविंदा कांबळे (२५) व अभिषेक भास्कर मेश्राम (१७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर शेजारीच उभी असलेली बबलूची आई शशिकला, गोविंदा कांबळे (५०), औत हाकणारे अविनाश चिंदू भोयर (३५), सोनू रवी कुडमथे, काजल भास्कर नान्हे, मानसी रामू दडांजे, साक्षी रामू दडांजे या सहा जणांचा जीव थोडक्यात वाचला. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. अशोक उईके, नायब तहसीलदार आर. बी. बिजे, मंडळ अधिकारी प्रशांत घडीकर, तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, पावसाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वीज पडू नये म्हणून झाडाखाली डोंगराळ भागात थांबू नये. 

मुदाटीत वीज कोसळली; गजाननचा मृत्यू, मारूती बचावला - झरी तालुक्यातील मुदाटी आणि राजनी येथेही मंगळवारी दुपारी वीज कोसळून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मुदाटी येथे गजानन कोचीराम टेकाम (४२) तर राजनी येथे लिंबेश कवडू आत्राम (३०) यांचा मृत्यू झाला. मृत गजानन टेकाम आणि त्याचा चुलत भाऊ मारोती सूर्यभान टेकाम हे दोघेही शेतात सारण्या फाडत हाेते. दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिकांना त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी गजाननला मृत घोषित केले. मारूती विजेच्या धक्क्याने प्रचंड प्रभावित झाला असून त्याच्या उपचार सुरु आहे. राजनी शिवारात लिंबेश आत्राम पाऊस सुरू झाल्याने मोहाच्या झाडाखाली थांबला होता. त्याच वेळी झाडावर वीज कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जागीच त्याचा मृत्यू झाला. पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. 

पोटचा जीव गेल्याने आईने फोडला हंबरडा - एकाच ठिकाणी काम करत असलेले सर्वजण जीव वाचविण्यासाठी झाडाखाली थांबले. यामध्ये आई व मुलाचाही समावेश होता. वीज कोसळताच सर्वजण हादरून गेले. डोळ्याची पापणी हालत नाही तोच मुलगा दगावल्याचा प्रसंग घडला. शशिकला कांबळे यांचा बबलू गोविंदा कांबळे हा मुलगा होता. डोळ्यासमोरच त्याचा मृत्यू झाल्याने शशीकला यांनी हंबरडा फोडला होता. 

 

टॅग्स :Rainपाऊस