शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून शेजाऱ्यानेच केला युवकाचा खून

By सुरेंद्र राऊत | Updated: April 30, 2024 15:20 IST

दोन वर्षापूर्वीच्या घटनेचा वचपा : लोहारातील पंचशीलनगरमध्ये थरार

यवतमाळ : शेजार धर्मात कोणताही वाद नको असे सांगितले जाते. शेजाऱ्याशी असलेला वाद कोणत्या टोकाला जाईल, याचा नेम नाही. शहरातील लोहारा परिसरातील पंचशील नगर येथे शेजारच्या भांडणातूनच युवकाला चाकूने भोसकून ठार करण्यात आले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. दोन वर्षापूर्वी मृतकाने आरोपीवर चाकूहल्ला केला होता. याच घटनेचा वचपा काढण्यात आला. 

जय विजय पाटील (२६) रा. पंचशीलनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. त्याचा शेजारी राहणाऱ्या दिगांबर उर्फ दीक्षित हिरणवाडे याच्याशी वाद होता. दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. दोन वर्षापूर्वी शुभेच्छा फलक फाडल्यावरून प्रकरण विकोपाला गेले. त्यावेळी जय पाटील याने चाकूहल्ला करून दिगांबर हिरणवाडे याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाठीत खुपलेला चाकू घेऊन दिगांबर शासकीय रुग्णालयात पोहोचला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव वाचला. मात्र शेजाऱ्यातील वाद धुमसत राहिला. जुन्या हल्ल्याचा वचपा काढण्याच्या प्रतीक्षेत दिगांबर होता. मंगळवारी त्याने जय पाटील हा ड्युटीवरुन परत आला असता त्याच्यावर चाकूने वार केले. यात जय गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला शासकीय रुग्णालयात आणले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे लोहारा पोलिसांकडून सांगण्यात आले. 

घटनास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. किरकोळ कारणाने वाढत गेलेल्या वादातून हकनाक एकाचा बळी गेला आहे, या प्रकरणात वृत्तलिहिस्तोवर पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ