शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 21:50 IST

प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : या गावाचे नाव उकंडा पोड... उकंडा म्हणजे केरकचरा साठविण्याची गावाबाहेरची जागा. नावाप्रमाणेच व्यवस्थेने या गावाचाही कचरा करून टाकलेला आहे. यवतमाळ शहराच्या काठावर असूनही एका जंगली खाईत वसलेल्या या दुर्लक्षित गावात विकासाची गंगा पोहाेचवू शकणारी चिटुकली शाळा आहे. पण गावच छोटे असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही छोटीच आहे. अन् या छोट्या संख्येचे निमित्त करून प्रशासनाने मोठे संकट आणले आहे. ते संकट आहे शाळा बंदीचे. कमी पटाच्या नावाखाली ही शाळा बंद झाली तर येथील १६ गरीब विद्यार्थ्यांचा सामना जंगलातल्या खऱ्या हिंस्र प्राण्याशी होणार आहे. कारण त्यांचे समायोजन झाले तर दोन किलोमीटरचा जंगल व्याप्त डोंगर ओलांडण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत. पूर्वी मोहा गट ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले उकंडा पोड आता मोहासोबतच यवतमाळ नगरपालिकेत विलीन झाले आहे पण यवतमाळ शहरातील ८० टक्के नागरिकांना उकंडा पोड नावाचे गाव आपल्या शेजारी असल्याची खबरबात नाही. या गावात उतरल्यावर बाहेरच्या दुनियेपासून पूर्णत: संपर्क तुटतो. गावात केवळ २०-२५ जणांकडे थोडीबहुत शेती आहे. त्यातील अर्धी शेती डोंगरात असल्याने पडित आहे. आता येथील शाळा कमी पटामुळे बंद (किंवा प्रशासनाच्या भाषेत समायोजित) केल्यास येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परगावात जाताना प्रचंड यातना भोगाव्या लागणार आहेत. 

विद्यार्थ्यांचा निरासग प्रश्न- इशानी रवी देवकर (पहिला वर्ग), मोरेश्वर केशव शिवणकर (पाचवा वर्ग), शिवा गजानन कुमरे (दुसरा वर्ग) साहील सुरेश डेबूर (दुसरा वर्ग), अंजना श्रीराम मादापुरे (पहिला वर्ग), विराट रवी देवकर (पाचवा वर्ग) हे उकंडा पोडचे विद्यार्थी मंगळवारी शाळेला सुटी असल्याने गावात खेळताना आढळले. त्यांना दुसऱ्या गावात शाळा गेली तर तुम्ही जाल का, असे विचारताच त्यांचे निरागस उत्तर नवा प्रश्न घेऊन आले... कितीक दूर अशीन थे शाळा? 

आमच्या गावात शाळा सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा बंद झाली तर दुसरी शाळाच नाही अन् यवतमाळच्या किंवा मोहाच्या शाळेत पाठविण्याची पालकांची परिस्थिती नाही.- बजरंग घोटेकर, गावकरी

गावाच्या चारही बाजूने असलेल्या जंगलात बिबटे, वाघ, हरिण, रानडुक्कर, रोही आहेत. अशा मार्गाने दररोज मुले दुसऱ्या गावातील शाळेत कसे जाणार? - राजू बोरकर, गावकरी

शासनाने या गावातील परिस्थितीचा विचार करावा. ही शाळा बंद झाली तर आमचे विद्यार्थी दुसऱ्या गावात जाणे अशक्य आहे. शाळेत जाता-येताना मलाच तर बिबट्या, रोही दर्शन देत असतात. मग मुलांच्या सुरक्षेचे काय? - अविनाश बनसोड, मुख्याध्यापक, उकंडा पोड

 

टॅग्स :Schoolशाळा