शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र बनविणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात

By रूपेश उत्तरवार | Updated: May 29, 2023 19:03 IST

Yawatmal News यवतमाळात बोगस प्रमाणपत्र प्रकरणात मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. त्याच्याकडून इतरही प्रकरणात माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

रूपेश उत्तरवार 

यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात प्रकल्पग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र देऊन फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहे. यामुळे भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची छाननी करण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षकांनी दिले होते. यवतमाळात अशा बोगस प्रमाणपत्र प्रकरणात मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. त्याच्याकडून इतरही प्रकरणात माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

यवतमाळ जिल्ह्यात चालक-शिपाई पदाच्या ५८ जागा आणि पोलिस शिपाई पदाच्या २४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचप्रमाणे इतर आरक्षण निश्चित करण्यात आले होते. याच आरक्षणाचा फायदा घेऊन उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र बनवून देणारी टोळी सक्रिय असल्याची बाबही पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी असे बोगस प्रमाणपत्र निष्पन्न झाले आहे. यामुळे विशेष पाेलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके यांनी पोलिस घटकांंना प्रमाणपत्रांची छाननी करण्याच्या सूचना दिल्या. यवतमाळमध्ये चार उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामधील किशोर किसन तोरकड बोरी वन येथील प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात पोलिसांनी कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी किशोर तोरकड याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती.

यावेळी त्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये असलेले शिक्षक नवनाथ शहाजी कदम यांच्याकडून हे प्रमाणपत्र बनविल्याचे मान्य केले. यामुळे पोलिस अधीक्षकांनी दराटी ठाणेदार भरत चापाईतकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करण्यात आली. त्यांनी बार्शी येथे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इतरही प्रकरणात शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस निरीक्षक भरत चापाईतकर, पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर, पोलिस अंमलदार संभाजी केंद्रे, सोहेल मिर्झा, ताज मोहंमद यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी