शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून पतीनेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून खात्री केली व श्रीकांतला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक मुलगा, एक मुलगी, याचा भाजीचा व्यवसाय, ती सौदर्य प्रसाधनाच्या दुकानात नोकर असा सुखी संसार सुरू असतानाच त्याच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. गुरुवारी पहाटे त्याने स्वत:च्या पत्नीचाच झोपेत गळा आवळून खून केला. पत्नी ठार झाल्याची खात्री केल्यानंतर तो थेट यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. ही थरारक घटना माळीपुरा परिसरात घडली. उर्मिला श्रीकांत श्रीरामे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा खून श्रीकांत उर्फ नागो तुकाराम श्रीरामे (३८) यानेच गळा आवळून केला. उर्मिला व श्रीकांतला पाच वर्षाची तनश्री व तीन वर्षाचा वंश अशी दोन मुले आहे. त्यांची दोन्ही मुले आत्याकडे नागपूर येथे शिकायला आहे. घरी उर्मिला व श्रीकांत हे दोघे व श्रीकांतचे वडील तुकाराम राहत होते. घरात कष्टाने आलेल्या पैशांतून आलबेल होते. मात्र का कुणास ठाकून श्रीकांत उर्मिलावर संशय घेऊ लागला. उर्मिलाचे माहेर बाभूळगाव तालुक्यातील. ती पतीसह २० मे रोजी लग्नाला जाऊन आली. तेव्हापासूनच श्रीकांतचा जाच वाढला. श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून खात्री केली व श्रीकांतला ताब्यात घेतले. या प्रकरणी उर्मिलाचा भाऊ होमराज नारनवरे रा. बाभूळगाव याच्या तक्रारीवरून श्रीकांतविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कौटुंबिक वादातून दुसरा खून - माळीपुरा परिसरात एकाच महिन्यात कौटुंबिक वादातून खुनाच्या दोन घटना झाल्या आहे. यापूर्वी मद्यपी मोठ्या भावाने स्वत:च्या आईवर हात उगारला हे पाहून लहान भावाला संताप अनावर झाला. त्याने चाकूने भोसकून भावाचा खून केला.  त्या पाठोपाठ नवभारत चौकात संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळला, अशा दोन घटना येथे झाल्या आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी