शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

गलेलठ्ठ पगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे मजुरांच्या रोजगारावर येणार टाच

By अविनाश साबापुरे | Published: May 18, 2023 2:20 PM

रोहयोच्या कामासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, यासाठी बीडीओंच्या संघटनेने शासनावर दबाव आणला आणि तसा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करून घेतला.

यवतमाळ : ग्रामीण माणसांना १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देणाऱ्या रोहयो योजनेची कामे प्रामुख्याने उन्हाळ्यातच मोठ्या प्रमाणात चालतात. मात्र, यंदा ऐन उन्हाळ्यातच शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ही कामे खोळंबली. अडीच हजार कोटींची तरतूद असताना आतापर्यंत केवळ १५८ कोटीचीच कामे होऊ शकलीत. त्यामुळे गलेलठ्ठ पगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे मजुरांच्या रोजगारावर टाच येणार आहे.रोजगार हमी योजनेच्या कामातून मुक्त करा, अशी मागणी करत राज्यातील ग्रामसेवकांनी मोठे आंदोलन केले. त्यानंतर राज्यभरातील गटविकास अधिकाऱ्यांनीही महिनाभर काम बंद आंदोलन केले.

रोहयोच्या कामासाठी आम्हाला जबाबदार धरू नये, यासाठी बीडीओंच्या संघटनेने शासनावर दबाव आणला आणि तसा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करून घेतला. ११ मेपासून ग्राम रोजगार सेवकांनीही मासिक मानधनासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही दिवसांपूर्वीच जुनी पेन्शनसाठी आंदोलन केले. त्यावेळीही रोहयोची कामे बंद होती. तांत्रिक सहायक, सहाय्य कार्यक्रम अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनीसुद्धा पगारवाढीसाठी आंदोलन केले होते. रोहयो कामांच्या साखळीतील या सर्व महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केल्याने यंदाचा उन्हाळा रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी ‘रिकामा’ गेला. या योजनेतील कामाचे अधिकाधिक दिवस हे उन्हाळ्यातच असतात, हे विशेष. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे अर्थसंकल्पात मंजूर झालेले हजारो कोटी रुपये खर्च होणार की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या खर्चाच्या संदर्भात कोणतेही कर्मचारी, अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

काम मिळाले नाही तर...रोहयोमध्ये १०० दिवसांच्या मजुरीची हमी घेण्यात आली आहे. एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यानंतर त्याला १५ दिवसात काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तसेच न झाल्यास मग्रारोहयोच्या नियमानुसार त्याला बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक आहे. मजुराला त्याच्या घरापासून पाच किलोमीटरच्या आतच काम देणे आवश्यक आहे. पाच किलोमीटरच्या पलीकडे कामाचे वाटप केल्यास मजुराला प्रवास भत्ता मिळण्याचा अधिकार आहे. यंदा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामांचे वांदे झाले आहेत. तेव्हा शासनाने मजुरांच्या बेरोजगारी भत्त्याबाबत, प्रवास भत्त्याबाबत ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे. 

महाराष्ट्र घेणार का पश्चिम बंगालचा धडा?रोहयोची सुरुवात महाराष्ट्राने सर्वप्रथम केली; पण आज या योजनेतून सर्वाधिक कामे करण्यात पश्चिम बंगालने आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगाल सरकार या योजनेसाठी वार्षिक ११ हजार कोटींची तरतूद करून ती खर्चही करीत आहे. महाराष्ट्रात मात्र अवघी अडीच हजार कोटींची वार्षिक तरतूद आहे. त्यातीलही मोजकाच निधी खर्च होत असल्याने मजुरांच्या कामांचे वांदे आहेत. मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी पश्चिम बंगालमध्ये अपर मुख्य सचिवांसह १५ दिवसांचा दौरा करून अभ्यासाअंती महाराष्ट्रातील योजनेत सुधारणा करण्याची घोषणा केली होती. परंतु, त्याबाबत अद्यापही हालचाली नाहीत.

बहुतांश कंत्राटदार राजकीय वशिला लावून मंत्रालयातून कामे मिळवतात. त्यातही कुशल कामेच मिळवितात. त्याचा जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास होतो. शिवाय कुशल कामांवरच भर दिला गेल्याने मजुरांना कामे कमी मिळतात. - विशाल ठाकरे, माहिती अधिकार कार्यकर्ता 

देशभरातील रोहयो मजुरीचे दरआंध्र प्रदेश २७२, अरुणाचल २२४, आसाम २३८, बिहार २२८, छत्तीसगड २२१, गोवा ३२२, गुजरात २५६, हरयाणा ३५७, हिमाचल २२४ (पेसा २८०), जम्मू काश्मीर २४४, लदाख २४४, झारखंड २२८, कर्नाटक ३१६, केरळ ३३३, मध्य प्रदेश २२१, मणिपूर २६०, मेघालय २३८, मिझोराम २४९, नागालँड २२४, ओडिसा २३७, पंजाब ३०३, राजस्थान २५५, सिक्कीम २३६, तामिळनाडू २९४, तेलंगणा २७२, त्रिपुरा २२६, उत्तर प्रदेश २३०, उत्तराखंड २३०, पश्चिम बंगाल २३७, अंदमान निकोबार ३२८, दादरा नगरहवेली, दमन दिव २९७, पाँडुचेरी २९४, लक्षद्वीप ३०४, महाराष्ट्र २७३ रुपये प्रतिदिन असे मजुरीचे दर आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ