शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'मॅट'चा निर्णय उच्च न्यायालयात रद्द; नव्याने सुनावणीचा आदेश

By विलास गावंडे | Updated: August 1, 2024 17:37 IST

Yavatmal : स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न

यवतमाळ : महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) नागपूरने घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने रद्द ठरवत नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे. वेतनश्रेणी देताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांवर झालेल्या अन्यायाविरोधात दाखल याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यात सुधारित निर्णय घेण्यात यावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतील आणि सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांवर कनिष्ठ अभियंतापदाची वेतनश्रेणी मंजूर करताना अन्याय करण्यात आला. वेतनश्रेणी मंजूर करताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या पूर्वीच्या संवर्गाचा आणि आस्थापनेचा विचार करण्यात आलेला नाही. वयाची ४५ वर्षे पूर्णत्त्वाच्या तारखेपासून कालबद्ध पदोन्नती योजनेंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची वेतनश्रेणी मंजूर करावी, यासाठी मॅटचे दार ठोठावण्यात आले.

महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाने या मागणीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथे याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर ११ ऑगस्ट २०१७ रोजी निर्णय देण्यात आला. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

नागपूर खंडपीठात या याचिकेवर २२ जुलै २०२४ रोजी अंतिम सुनावणी झाली. मॅटने ११ ऑगस्ट २०१७ रोजी जाहीर केलेला निर्णय यावेळी रद्द करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी नव्याने घेऊन पुढील तीन महिन्यात सुधारित निर्णय जाहीर करावा, असा आदेश मॅटला देण्यात आला आहे. जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतील तथा सेवानिवृत्त १३ हजार स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांचे आता 'मॅट'च्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

'मॅट'चा आदेश टिकावू नाहीनागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशात 'मॅट'ने दिलेला आदेश टिकावू नसल्याचे नमूद केले आहे. वस्तूस्थिती लक्षात घेऊन याचिकाकर्त्यांच्या अर्जावर निर्णय घेण्यात यावा, असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे.

"उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश २२ जुलै २०२४ रोजी मॅटला दिला आहे. याची तातडीने दखल घेण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. मॅट सकारात्मक निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे."- रा. म. लेडांगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघ

टॅग्स :YavatmalयवतमाळnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय