शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला निघालेल्या शिक्षक दाम्पत्याचे चक्क पाच लाखांचे सोने प्रवासात उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

पंकज राठोड रा. अयोध्यानगरी नागपूर हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक्षरश: राठोड दांपत्याला घेरले. याच पाच मिनिटात त्यांनी बॅग धारदार वस्तूने कापून दागिने  बांधून असलेली पुरचंडी  बाहेर काढून घेतली. हा प्रकार राठोड दांपत्याच्या लक्षात आला नाही. मात्र महिला अधिकच लगट करीत असल्याने त्यांनी त्यांना खडेबोल सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर येथील शिक्षक  दाम्पत्य घाटंजी तालुक्यातील वासरी येथे लग्नाला जाण्यासाठी यवतमाळला आले. वर्धा येथून पाच महिलांची टोळी ट्रॅव्हल्समध्ये बसली. या महिलांनी रेटारेटी करीत बॅग कापून त्यातील पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी ४ वाजता दरम्यान घडली. यवतमाळातील लुटारू महिलांची टोळी विदर्भात कुप्रसिद्ध आहे. या टोळीचा हा कारनामा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पंकज राठोड रा. अयोध्यानगरी नागपूर हे पत्नीसह वासरी येथे मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी बुधवारी नागपूर येथून निघाले. खासगी ट्रॅव्हल्समध्ये वर्धेसमोर सावंगी मेघे येथून पाच महिला बसल्या. त्या महिलांनी यवतमाळजवळ येताच रेटारेटी सुरू केली. काही मिनिट अक्षरश: राठोड दांपत्याला घेरले. याच पाच मिनिटात त्यांनी बॅग धारदार वस्तूने कापून दागिने  बांधून असलेली पुरचंडी  बाहेर काढून घेतली. हा प्रकार राठोड दांपत्याच्या लक्षात आला नाही. मात्र महिला अधिकच लगट करीत असल्याने त्यांनी त्यांना खडेबोल सुनावले. नंतर राठोड दांपत्य यवतमाळात उतरले.यवतमाळमध्ये त्यांनी बॅग उघडून बघितली असता त्यातील सोन्याची पुरचंडी आढळली नाही. दागिने घरीच राहिले असतील, असा संशय आल्याने खासगी वाहन करून ते तत्काळ नागपूर येथे पोहोचले. मात्र नागपूरातील घरीही दागिने मिळाले नाही, पुन्हा त्यांनी प्रवासाला घेतलेली बॅग तपासली तेव्हा त्या बॅगेला चिरा असल्याचे आढळून आले. नंतर प्रवासातील  पूर्ण घटनाक्रमच त्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. ट्रॅव्हल्समधील प्रवासात त्या पाच महिलांनी कोंडाळे करुन गर्दीत बॅग कापली आणि बॅगमध्ये साडीत गुंडाळून ठेवलेली पुरचंडी बॅगमधून  अलगद बाहेर काढली. या प्रकरणी पंकज राठोड यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रवासात आढळलेल्या पाच महिलांचे वर्णन यवतमाळातील दारव्हा मार्गावरील एका वस्तीतील लुटारू महिलांच्या टोळीशी तंतोतंत जुळणारे आहे. मात्र अजून पोलीस या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांच्याही सतर्कतेची गरज आहे.

 लुटारू महिलांचा अनेकांना फटका - शहरासह लगतच्या जिल्ह्यांमध्ये बसस्थानक अथवा प्रवासादरम्यान लुटणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय आहे. महिला असल्याचा फायदा घेत पुरुषांनाही ही टोळी गप्प बसविते. घाईगर्दी, धावपळ करून मौल्यवान ऐवज अलगद लंपास करते. यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याचा सुगावा लागलेला नाही. संशयित महिलांना पाेलीस ताब्यात घेतात. परंतु मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागू देत नाही. 

 

टॅग्स :Thiefचोर