शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावरून कापड येणार कापून, गावातील महिला देणार शिवून!

By अविनाश साबापुरे | Updated: March 24, 2024 11:41 IST

राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येकी दोन गणवेश

यवतमाळ : जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावरून ठराविक मापात कापलेला कापड पुरविला जाणार असून गावातील बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. याबाबतचा ‘कार्यारंभ’ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याबाबत परिषदेमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून मे. पद्मचंद मिलापचंद जैन यांना ४ मार्च रोजी ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांसाठी कापड पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे. हा कापड पुरविल्यानंतर गावपातळीवरील महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई केली जाणार आहे.विशेष म्हणजे, कापड पुरवठादार प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बीआरसी, सीआरसीपर्यंत कापड पुरविणार आहे. या कापडाच्या बाॅक्सला केंद्र सरकारच्या टेक्स्टाईल कमिटीचे सील असेल. 

६४ बाॅक्समध्ये येणार कापडप्रत्येक बीआरसी, सीआरसी केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ६४ स्वतंत्र बाॅक्स उपलब्ध होतील. प्रत्येक बाॅक्समध्ये १०० गणवेशाच्या कापडाचे तुकडे (मायक्रो कटिंग केलेले) असतील. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी चार आणि प्रत्येक विद्यार्थिनीसाठी चार बाॅक्समध्ये हे कापडाचे तुकडे असतील. त्या तुकड्यांमधून बचत गटांना एक गणवेश तयार करून द्यायचा आहे. गणवेश शिवण्यापूर्वी महिला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची मापे स्टँडर्ड मापानुसार आहेत की नाही, याची खात्री करतील.

त्रुटी आढळल्यास दुरुस्ती  शिवून तयार झालेल्या गणवेशाचा पुरवठा बचत गटामार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत करण्यात येणार आहे.शिलाईत त्रुटी आढळल्यास बचत गटामार्फतच दुरुस्ती केली जाणार आहे.  

असा असेल गणवेश२०२४-२५ या सत्राकरिता दोन गणवेश पुरविले जाणार आहेत. यात एक गणवेश नियमित तर दुसरा स्काउट गाईडचा असेल. नियमित गणवेशामध्ये मुलांसाठी आकाशी शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट. मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. आठवीच्या विद्यार्थिनीसाठी ओढणीसाठीही कापड पुरविला जाणार आहे.

मोबदला ११० रुपये प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या गणवेशासाठी किती कापड लागेल, याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदविली जाईल. जेवढे गणवेश द्यायचे आहेत, तेवढे कापड ठराविक (स्टँडर्ड) मापानुसार कापून (मायक्रो कटिंग करून) पुरवठा केला जाईल. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना ११० रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा