शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशाचा कापड पंचायत समितीतच पडून; शाळा सुरू होऊन महिन्याच्या वर पण गणवेश अजूनही मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 19:13 IST

गणवेशाविना स्वातंत्र्यदिन : राज्य शासनाच्या धोरणात दरवर्षी बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क वणी: वणी तालुक्यात प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारे मोफत गणवेश काही विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाले नसल्याने त्यांना नव्या गणवेशाविनाच स्वातंत्र्यदिन करावा लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत दोन गणवेश, बूट व पायमोजे देण्याची घोषणा शासनाने केली होती. एक गणवेश स्काउट गाईडचा होता. एक नियमित, असे दोन गणवेश मिळणार होते. यातील स्काउट गाईडचे कापड एक महिन्यापासून पंचायत समितीत पडून आहे. अजूनपर्यंत ते शाळेला वाटप झाले नाही.

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेश सक्तीचे होते. मात्र, यावर्षी शासनाने शाळांना गणवेशाचे कापड पुरविण्याचे घोषित केले. शाळा सुरू होऊन एक महिन्याच्या वर झाला. परंतु एकही तयार गणवेश शाळेत पोहोचला नाही. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे कंत्राट दारव्हा येथील एका संस्थेला दिल्याची माहिती आहे. 

दुसऱ्या गणवेशाचे कापड पंचायत समिती स्तरावर पडून आहे. ते कापून प्रत्येक शाळांना देणे, त्यांनी ते नंतर बचत गटातील महिलांकडून गणवेश शिवून घेणे, अशी प्रक्रिया आहे. ते कधी मिळेल, हे सांगता येत नाही. हा गणवेश स्काऊट गाईडचा असणार आहे. बचत गटांना शिलाईसाठी ११० रुपये दिले जाणार आहेत.

एवढ्या कमी पैशात गणवेश शिवून देणे बचतगटांनाही परवडणार नसल्याने बचतगटाच्या महिलाही शालेय गणवेश शिवतील का, हा प्रश्न आहे. अधिकची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीला देऊन पालकांना हे गणवेश शिवून घ्यावे लागणार आहेत. 

मागणीचा विचारच नाही पहिली ते आठवीच्या प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश मोफत देण्याची योजना आहे. मुलांना आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची हाफ वा फूल पँट, तर मुलींना आकाशी रंगाचा टॉप व गडद या रंगाचा स्कर्ट असा गणवेश आहे. पाचवी ते आठवीच्या मुलींना टॉप व स्कर्ट नको. त्यांना त्याच रंगाचा सलवार कमीज असा गणवेश द्यावा, अशी मागणी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाकडे केली आहे. मात्र या मागणीचा शालेय शिक्षण विभागाने अद्यापही विचार केला नसल्याचे दिसून येत आहे.

"नियमित गणवेश शाळांना अजून दिले नाहीत. कारण ते अजूनपर्यंत मिळालेच नाही. दुसऱ्या स्काऊट गणवेशाचे कापड वाटप केले जाईल." - स्नेहदीप काटकर, गटशिक्षणाधिकारी, वणी

टॅग्स :Yavatmalयवतमाळ