शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या पुत्रप्रेमाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा सावध पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच  घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबापुरतीच मर्यादित झाली आहे. कोणत्याच नेत्याला माजी झाल्यानंतरही पुत्रप्रेमाचा मोह सोडवत नाही. यामुळे अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. याचा परिणाम पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर झाला आहे. आतापर्यंत २८ हजार सदस्य नोंदणी झाली असून त्यासाठीही १५ दिवसांची मुदतवाढ घ्यावी लागली आहे. काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच  घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे. त्यामुळेच १६ तालुके असलेल्या २७ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात जेमतेम २८ हजारांवर सदस्य नोंदणी झाली. पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले. त्यासाठी मोबाईल लिंक देण्यात आली. मात्र नेत्याने पक्षाच्या कामात कधीच रस दाखविला नाही. याउलट युवक काँग्रेसच्या निवडणुकीत नेत्यांचे पुत्र उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यावेळी सामदामदंड भेद वापरून आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पराभव कसा होईल यासाठी जंगजंग पछाडले. परिणामी नेत्यांचे पुत्रच पक्षांतर्गत निवडणुकीत विजयी      झाले. सामान्य कार्यकर्त्याला अपवादाने संधी मिळत असल्याने आता त्यांनीही पक्षकार्यातून आपले लक्ष कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळेच सदस्य नोंदणीत काँग्रेस माघारली. यवतमाळ विधानसभेत तर जेमतेम १४०० सदस्य नोंदविता आले. हे पक्षाचे होत चाललेले अध:पतन  मानले जात आहे. खासगीत कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करीत आहे. 

 कार्यकर्ते घडविणाऱ्या लाेकनेत्याची वानवा - जिल्ह्यातील काँग्रेसने राज्याला व देशाला अनेक प्रतिभावान नेते दिले आहेत. या नेत्यांनी खऱ्या अर्थाने लोकनेत्याची भूमिका बजावत पक्षातील कार्यकर्त्यांनाही वेळोवेळी संधी दिली. त्यामुळेच पक्ष सतत सत्तेत होता. मात्र, नंतरच्या काळात पक्षात साठमारी होऊ लागली. आमदार, मंत्री असलेल्यांनी कार्यकर्त्यांऐवजी स्वत:च्या मुलांनाच पद मिळावे यासाठी परिश्रम घेणे सुरू केले. परिणाम सामान्य कार्यकर्ता पक्ष कार्यातून अलिप्त राहू लागला. याचा फटका विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सातत्याने बसला आहे. आताही कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या लोकनेत्याची काँग्रेसला व जिल्ह्याला गरज भासत आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेस