शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावरचा हल्ला निंदनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 18:17 IST

आमदारांनी खुलासा करावा : संदीप बाजोरिया यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर भाजप आमदाराच्या घराजवळ चाकूहल्ला झाला. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यावर चाकूहल्ला कुणी व का केला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्यासोबतच पोलिस अधीक्षकही याबाबत मौन बाळगून आहेत. आपण आमदार झाल्यास यवतमाळातील गुन्हेगारीचा बीमोड यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

यवतमाळ शहर व विधानसभा क्षेत्रात अनेक गंभीर समस्या आहेत. स्थानिक आमदारांचे कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे गाव पूर्णतः बकाल झाले आहे. चांगले अधिकारी येथे टिकू दिले जात नाही. सोयीचे अधिकारी आणून भ्रष्टाचार केला जातो. यवतमाळ नगरपालिकेत प्रशासन शिल्लक नाही. कचऱ्याचे कंत्राट घेऊन वर्षाला दहा ते बारा कोटी रुपये हडपले जात आहेत. स्वच्छता कुठेच नाही. अ दर्जाची पालिका असतानाही फॉगिंग मशीन उपलब्ध नाही. शहरात १५-१५ दिवस नळाचे पाणी येत नाही. निळोणा व चापडोह या प्रकल्पात तुडुंब पाणीसाठा आहे. तरीही नियोजन केले जात नाही. अनेक भागात रस्तेच नाहीत. सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. अशी स्थिती असतानाही ठराविक भागात मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर नवीन रस्ते बांधले जात आहेत. 

यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे. अमृत योजना ही विषयोजना झाली आहे. यात निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आता, भूमिगत गटारासाठी रस्ते खोदले जात आहेत. एकूणच सरकारी पैशाची लूट शहरात सुरू आहे, असा आरोप संदीप बाजोरिया यांनी केला. 

आठ दिवसात प्रशासन काम कसे करणार ?विकास निधी कित्येक वर्षे खर्च केला जात नाही. आता आचारसंहिता लागणार असताना जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे, या निधीच्या खर्चाचे आठ दिवसात नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. डिनर सेटचे वाटप थेट कार्यकर्त्यांच्या घरून केले जात आहे. स्थानिक अधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग द्यायवतमाळात सुप्रसिद्ध असा नवरात्रोत्सव साजरा होतो. राज्यातील विविध ठिकाणांवरून भाविक येथे येतात. ९ दिवस अनेकांना उपवासाचे असतात. कुणी पायात चप्पलही वापरत नाही. अशा भाविकांची वाहने शहराबाहेर उभी ठेवणे चुकीचे आहे. भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग सुविधा द्यावी, जेणे करून त्यांना त्रास होणार नाही, अशी मागणी संदीप बाजोरिया यांनी यावेळी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाYavatmalयवतमाळ