शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी घोटाळ्याचा टायपिंगलाही फटका; दोन लाख विद्यार्थी अडचणीत, तीन महिने उलटूनही निकाल लागेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 07:25 IST

शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे.

अविनाश साबापुरेयवतमाळ : शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे. या दोन्ही परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून कारागृहात गेले आणि परिषदेचा कारभार ढेपाळल्याने गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोणत्याही परीक्षेचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कुठेही अर्ज करता येत नाही.टंकलेखन, संगणक टंकलेखन आणि लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) या परीक्षांचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केले जाते. नोव्हेंबर २०२१मध्ये महाराष्ट्रातील दोन लाख विद्यार्थ्यांनी संगणक टंकलेखनाची परीक्षा दिली.

मात्र, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या परीक्षेचा निकाल आता साडेतीन महिने उलटूनही परीक्षा परिषदेने जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील चार हजार टायपिंग इन्स्टिट्यूटपुढे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. टीईटी परीक्षाही नोव्हेंबरमध्येच झाली होती. टायपिंग उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिले. निकाल कधी येणार, असा तगादा हे विद्यार्थी इन्स्टिट्यूट चालकांकडे लावत आहेत. मात्र, त्याचे उत्तर कुणाकडेही नाही.

परीक्षा परिषदेचा जाच नेहमीचाच

  • टायपिंग अभ्यासक्रमाचे ६-६ महिन्यांचे अशी वर्षातून दोन सत्र घेतली जातात. पहिल्या परीक्षेचा निकाल लागल्याशिवाय दुसऱ्या सत्राला ॲडमिशन मिळत नाही. मात्र, परीक्षा परिषद कधीही तीन महिन्यांच्या आत निकाल लावत नाही.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे देण्यासाठीही तीन महिने विलंब केला जातो. याचा फटका विद्यार्थ्यांसह इन्स्टिट्यूट चालकांना सहन करावा लागतो. परीक्षेबाबत इन्स्टिट्यूटला ‘बॅच लिस्ट’ पाठविण्याची तसदीही परिषद घेत नाही.
  • विशेष म्हणजे आधीचा निकाल लावलेला नसताना परीक्षा परिषदेने पुढील फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित परीक्षेचे अर्ज, शुल्कही भरून घेतले. मात्र, या परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.
टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रYavatmalयवतमाळ