शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘पीआरसी’ने नोंदविली सीईओंची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील पंचायतराज समिती मंगळवारी यवतमाळात दाखल झाली. पहिल्या दिवशी आमदार विक्रम काळे, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे सोबत होते. मंगळवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पक्षाची बैठक बोलविल्याने शिवसेनेचे आमदार सहभागी होऊ शकले नाही. मात्र, हे आमदार बुधवारपासून पीआरसीच्या दाैऱ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसात आमदारांची उपस्थिती : जिल्हा परिषद सभागृहात पूनर्विलोकन अहवालावर चर्चा

 लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य विधिमंडळाची पंचायतराज समिती (पीआरसी) तीन दिवसीय जिल्हा दाैऱ्यावर असून, मंगळवारी या समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील पंचायतराज समिती मंगळवारी यवतमाळात दाखल झाली. पहिल्या दिवशी आमदार विक्रम काळे, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे सोबत होते. मंगळवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पक्षाची बैठक बोलविल्याने शिवसेनेचे आमदार सहभागी होऊ शकले नाही. मात्र, हे आमदार बुधवारपासून पीआरसीच्या दाैऱ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी असा तीन दिवस पीआरसीचा दाैरा आहे. या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर  सुमारे महिनाभरापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये तयारी, रेकाॅर्ड अपडेशन सुरू होते. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे पंचायतराज समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी या समितीसोबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ही समिती दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोहोचली. तेथे सन २०१०-११ व २०१६-१७ च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालावर चर्चा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची साक्ष समितीने नोंदविली. यावेळी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अभियंते, कॅफो, बीडीओ, शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. हे अधिकारी साक्षच्या वेळी उपस्थित होते. स्थानिक निधी लेखा विभागाने ऑडिट करताना खर्चावर नोंदविलेले आक्षेप, त्याची परिपूर्तता, आक्षेप वगळणे, संबंधितावर कारवाई, दंडवसुली, अपहाराच्या रकमेची वसुली, प्रलंबित लेखा आक्षेप अशा विविध मुद्द्यांवर पंचायतराज समितीने फोकस निर्माण केला. पंचायतराज समितीचा मंगळवारचा पहिला दिवस शांततेत पार पडला. बुधवारपासून ही समिती ग्रामीण भागात धडक देणार आहे.

पंचायतराज समितीची ग्रामीण यंत्रणेत दहशत वेळप्रसंगी जागीच निलंबित करण्याचे अधिकार असलेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीची जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या यंत्रणेमध्ये, एवढेच नव्हेतर पदाधिकाऱ्यांमध्येसुद्धा कमालीची दहशत पाहायला मिळते. मात्र, ही दहशत काहीशी आदरयुक्तही आहे. यापूर्वी पंचायतराज समितीचा दोनवेळा मुहूर्त टळला होता. यावेळी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरसुद्धा पीआरसी येणार की नाही, अशी साशंकता यंत्रणेतून ऐकायला मिळत होती. परंतु अखेर एकदाची पीआरसी धडकली.  पीआरसी येणार म्हणून महिनाभरापासून जिल्हा परिषदेची वणी ते उमरखेडपर्यंतची यंत्रणा कमालीची सक्रिय झाली होती. नागरिकांनी अनेक कर्मचाऱ्यांना तर पहिल्यांदाच एवढ्या गतीमानतेने काम करताना पाहिल्याचाही अनुभव सांगितला. ही पंचायतराज समिती आता जिल्ह्यात नेमकी कुठे भेटी देणार, यावर संपूर्ण यंत्रणेच्या नजरा आहेत. आपल्या तालुक्यात, कार्यालयात, गावात, शाळेत, केंद्रात येऊ नये, यासाठी जणू तेथील यंत्रणा देव पाण्यात बुडवून बसल्याचे चित्र आहे. या भेटीबाबत फोनवरून सातत्याने कानोसा घेण्याचा प्रयत्नही होतो आहे.  पंचायतराज समितीच्या सरबाराईत कोणतीही कसर राहू नये, उगाच त्यांची नाराजी नको म्हणून महिनाभरापासून खास टार्गेटही दिले गेले आहे. त्यांच्या सरबराईत यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. काहीही कमी पडू नये या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.  पहिल्या दिवशी पीआरसीचे सातच सदस्य असले तरी बुधवारपासून ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे पीआरसी वेगवेगळ्या गटात विभागून वेगवेगळ्या दिशेने दाैरा करते की सर्वजण एकाच दिशेने निघतात, यावर नजर आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद