लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यालगतच्या संपूर्ण परिसरात वाघाची दहशत कायम आहे. त्यामुळे शेतकरी-शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरातील वाºहा, कवठा, कोपामांडवी, कोंबई, अंधारवाडी, वांजरी, बल्लारपूर या परिसरात वाघाची सर्वाधिक दहशत आहे. या परिसरात निवडणूक प्रचाराला आलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवाराला या परिसरातील शेतकऱ्यांनी आधी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे. टिपेश्वर अभयारण्यात असलेल्या जंगलातही अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. याशिवाय अस्वल व इतर वन्प्राण्यांनीसुद्धा या परिसरात धुमाकूळ घातला असून शेतकºयांना आपल्या शेतात जाणे मुश्किल झाले आहे. पाटणबोरी परिसरातील अनेक गावातील शेतकºयांच्या शेतातील पिके वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केली आहे. या परिसरात एक अस्वलसुद्धा असून परिसरातील ग्रामस्थांनी या प्राण्यांची धास्ती घेतली आहे.महावितरणकडून सिंचनासाठी दिवसा विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. या परिसरात भारनियमन राहत असून अनेकदा दिवसा विजेचा पुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतातील सिंचन करणे होत नाही. शेतकºयांना आपल्या शेतात रात्री जाऊन सिंचन करावे लागते. आजुबाजूला जंगल लागून असल्याने वाघाने अनेक शेतकºयांना दर्शन दिले आहे. बल्लारपूर येथील शेतकरी अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला. तेव्हापासून शेतकºयांनी वाघाची धास्ती घेतली आहे.
पांढरकवडा तालुक्यात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST
टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरातील वाºहा, कवठा, कोपामांडवी, कोंबई, अंधारवाडी, वांजरी, बल्लारपूर या परिसरात वाघाची सर्वाधिक दहशत आहे. या परिसरात निवडणूक प्रचाराला आलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवाराला या परिसरातील शेतकऱ्यांनी आधी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे. टिपेश्वर अभयारण्यात असलेल्या जंगलातही अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे.
पांढरकवडा तालुक्यात वाघाची दहशत
ठळक मुद्देशेतीकामे ठप्प : सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी