लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद प्रशासनाने २१ दुकान गाळ्यांचा भाडे करार संपल्यानंतर त्यांचे नव्याने वितरण करण्याची निविदाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. यातून पालिकेच्या उत्पन्नात जादा भर पडण्याची शक्यता दुरावली आहे.दुकान गाळ्यांच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न हा नगरपरिषदेचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. मात्र, याच उत्पन्नाला सुरूंग लावण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. नगरपरिषदेच्या मालकीची महादेव मंदिर मार्केट, जुने दत्त चौक मार्केट, संजय गांधी मार्केट, मटन मार्केट, बिफ मार्केट, दत्त चौक भाजी मार्केटमधील तळ मजल्यावरची सहा दुकाने, तिसºया मल्याजवरील दोन दुकाने, महात्मा फुले मार्केटच्या तिसºया मजल्यावरील दोन दुकाने, तर टिनशेडची ११ दुकाने भाड्याने देणे आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रशासनाने ही निविदा सोयीच्या पद्धतीने प्रसिद्ध केली.निविदा प्रसिद्धीसाठी ‘रोटेशन’चे कारण पुढे करून कुणाला माहितीच होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. स्पर्धा न होता मर्जीतील व्यक्तींना दुकानांचा लाभ देता येईल, अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे. पालिका प्रशासनातील काही ज्येष्ठांनी हा जुना फंडा नव्याने मांडला. त्याला प्रशासन प्रमुखाची साथ मिळत असल्याने सर्व काही ‘आलवेल’ आहे. या प्रकरणाची आता खुद्द नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनीच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लिपिकाने परस्पर वाढविली लिजयापूर्वी बाजार विभागात कार्यरत एका लिपिकाने परस्परच तत्कालीन सीओंच्या नावाने कारभार करीत काही गाळेधाकरांना तब्बल २0 वर्षांची लीज दिली होती. यात कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नाही. यात भाडे कराराचा भंग करून दुकानांच्या मूळ संरचनेत बदल करणाºया दुकानदाराशी लाखोंच्या घरात आर्थिक व्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्वत: होऊनच या दुकानाचे सील काढण्यात आले होते. या प्रकरणात त्या लिपिकाला निलंबितही करण्यात आले. मात्र, त्यापुढे कारवाई गेली नाही. आता तोच कित्ता येथे गिरविला जात आहे.ज्या वृत्तपत्राचा खप अधिक आहे, अशा वृत्तपत्रात दुकान गाळ्यांची निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश दिले. मात्र, त्याची दखल घेतली नाही. शेवटी १२ डिसेंबरला जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.- कांचन बाळासाहेब चौधरीनगराध्यक्ष, यवतमाळ
दुकान गाळ्यांच्या निविदा मॅनेजचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 22:11 IST
नगरपरिषद प्रशासनाने २१ दुकान गाळ्यांचा भाडे करार संपल्यानंतर त्यांचे नव्याने वितरण करण्याची निविदाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. यातून पालिकेच्या उत्पन्नात जादा भर पडण्याची शक्यता दुरावली आहे.
दुकान गाळ्यांच्या निविदा मॅनेजचा प्रयत्न
ठळक मुद्देनगरपरिषद प्रशासनाची मिलीभगत : मोक्याच्या जागेवरील २१ गाळ्यांचा भाडे करार संपला