लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : पोस्ट ऑफिसतर्फे ‘आपली बँक-आपल्या दारी’ अभियानांतर्गत ४ जानेवारीला एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने शिबिर घेतले. या शिबिरात एकाच दिवशी तब्बल १0 हजार ६४ खाते उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा डाक अधीक्षक मनोहर पत्की यांनी येथील पोस्टात आयोजित कार्यक्रमात दिली.मनोहर पत्की यांनी आर्णी पोस्ट ऑफीसला भेट दिली. त्यांनी पोस्ट ऑफीसच्या कामाची पाहणी केली. पोस्टात आलेल्या नागरिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची माहिती देउन उपस्थितांचे खाते उघडले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश हिरूळकर यांच्यासह अनेक नागरिकांचे खाते यावेळी उघडण्यात आले. त्यांना ई-बँकेचे कार्ड मनोहर पत्की यांनी प्रदान केले. यावेळी जिल्हा पोस्ट ऑफिसचे नीलेश गावंडे, संजय सोनटक्के, आर्णीचे उपपोस्टमास्तर संभाजी जामकर, राजेश माहेश्वरी, जी.जे. देशमुख, जी.आर. भुसारी, विश्वनाथ तलांडे, सूरज मिसाळ, ईश्वर सुरोशे, निरंजन बोंबलगे, शरद इरतकर आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा डाक अधीक्षकांनी ‘आपका बँक-आपके द्वार’ अभियानांतर्गत जिल्ह्याच्या शहर विभागात ४0, तर ग्रामीण विभागातील ३२८ पोस्ट ऑफीसमध्ये एकाच दिवशी १0 हजार ६४ नवीन खाते उघडल्याचे सांगितले. या खात्यांच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या बँंकेचे व्यवहार करू शकणार आहे. संपूर्ण भारतातील पोस्ट ऑफीसमध्ये गेल्यास तेथेही पैशाचे व्यवहार करू शकणार आहे. या खात्यांचे क्यू आर कार्ड असेल. त्यामार्फत नागरिक कोणत्याही बँकेतील पैसे काढू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडून नागरिकांनी आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन पत्की यांनी केले.
एकाच दिवशी उघडले १० हजार पोस्ट बँक खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST
मनोहर पत्की यांनी आर्णी पोस्ट ऑफीसला भेट दिली. त्यांनी पोस्ट ऑफीसच्या कामाची पाहणी केली. पोस्टात आलेल्या नागरिकांसह सर्व कर्मचाऱ्यांना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची माहिती देउन उपस्थितांचे खाते उघडले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश हिरूळकर यांच्यासह अनेक नागरिकांचे खाते यावेळी उघडण्यात आले. त्यांना ई-बँकेचे कार्ड मनोहर पत्की यांनी प्रदान केले.
एकाच दिवशी उघडले १० हजार पोस्ट बँक खाते
ठळक मुद्देबँक आपल्या दारी : कोणत्याही बँकेतून पैसे काढण्याची सुविधा