अश्रूभरल्या डोळ्यांनी शेतकऱ्याने कापसावर फिरवला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 10:46 AM2020-10-31T10:46:05+5:302020-10-31T10:46:28+5:30

Yawatmal News farmer नेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अश्रूभरल्या डोळ्यांनी स्वत:च्या हाताने पेरलेल्या व जोपासलेल्या कापसाच्या शेतावर नांगर फिरविल्याची घटना येथे घडली.

With tears in his eyes, the farmer turned the plow on the cotton | अश्रूभरल्या डोळ्यांनी शेतकऱ्याने कापसावर फिरवला नांगर

अश्रूभरल्या डोळ्यांनी शेतकऱ्याने कापसावर फिरवला नांगर

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अश्रूभरल्या डोळ्यांनी स्वत:च्या हाताने पेरलेल्या व जोपासलेल्या कापसाच्या शेतावर नांगर फिरविल्याची घटना येथे घडली. परतीच्या पावसाने त्याच्या शेतातील कापसाचे मातेरे केले. तब्बल पाच एकर शेतात लावलेल्या कापसाला कीड लागली होती. हमीद खां असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान कृषी विभागाने या घटनेची दखल घेत त्या शेताची पाहणी केली. हमीद खां आपल्या शेतावर नांगर फिरवत असल्याची बातमी कळताच कृषी विभागाच्या पथकाने त्यांचे शेत गाठले. पऱ्हाटीची बोंडे फोडून पाहिली असता आत कीड आढळली. या पिकाचा पंचनामा करण्यात आला आहे. आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा हमीद खां यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: With tears in his eyes, the farmer turned the plow on the cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती