शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या भेटीने चिमुकल्यांना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:01 IST

तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले. तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार्यरत होत्या.

ठळक मुद्देमहागावचे विद्यार्थी : बदली झाल्याने मुले गहिवरली, पालकांच्याही कडा ओलावल्या

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले.तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार्यरत होत्या. गेली पाच वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिले. आता उपक्रमशील शिक्षिका हिरा धुर्वे यांची आर्णी पंचायत समितीमधील कुऱ्हा येथे बदली झाली आहे. त्या नवीन गावी रूजू झाल्या. मात्र विद्यार्थ्यांच्या ओढीने त्या महागावला त्यांच्या भेटीसाठी आल्या. त्या शाळेत येताच चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले. चिमुकल्यांचे हे प्रेम बघून हिरातार्इंनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्यातील हा भावपूर्ण प्रसंग डोळ्यात साठवताना उपस्थित शिक्षक, पालकांनाही गहीवरून आले. सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. क्वचितच शिक्षक, शिक्षिका विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहतात. त्यापैकीच एक हिरा धुर्वे ठरल्या. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले. म्हणूत त्या विद्यार्थीप्रिय ठरल्याचे यावेळी स्पष्ट झाले.याप्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय गावंडे, विषय शिक्षक गिरीश साबळे, अमिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका सूर्यकांता नरवाडे, सारिका माळवे यांनीही भावना व्यक्त केल्या.विद्यार्थी, पालकांना जिंकलेहिरा धुर्वे यांनी शिक्षकी पेशा ही केवळ सरकारी नोकरी नसून एक व्रत असल्याचे मानले. त्यांनी आपल्या कार्याने विद्यार्थी व पालकांच्या मनात स्थान निर्माण केले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून महागाव येथे उल्लेखनीय कार्य केले. आता कुऱ्हा येथे बदली झाली, तरीही महागावच्या चिमुकल्यांच्या ओढीने त्या त्यांना भेटायला आल्या. शिक्षकांनी वटवृक्ष देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षक