शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

पुसदला वेतननिश्चितीसाठी शिक्षकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:20 IST

माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येथे आयोजित दोन दिवसीय पेफिक्सेशन शिबिरात शहरासह तालुक्यातील खासगी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देशिबिराला प्रतिसाद : अर्ध्याअधिक शाळांची सेवा पुस्तके सादर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येथे आयोजित दोन दिवसीय पेफिक्सेशन शिबिरात शहरासह तालुक्यातील खासगी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी पहिल्या दिवशी तालुक्यातील ६४ माध्यमिक शाळांपैकी ३९ शाळांनी शिबिरात शिक्षकांच्या सेवापुस्तिका सादर करून पेफिक्सेशन करून घेतले.माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, जिल्हा वेतन पथक अधीक्षक प्रमोद सोनटक्के व लेखाधिकारी यू.डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुणवंतराव देशमुख विद्यालयात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस तालुकास्तरीय वेतननिश्चिती शिबिर होत आहे. याप्रसंगी लेखाधिकारी यू.डी. चव्हाण यांच्या नेतृत्वात कनिष्ठ लेखा परीक्षक एस.व्ही. देवळे व एन.यू. फाटकर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहे. या शिबिरात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रकाश लामणे, मुख्याध्यापक अजय खैरे, अशोक पोले, मुख्याध्यापक सादिक शेख, मुख्यापक संजीवकुमार वाघमारे, सुरेश नारखेडे, दत्ता शिंदे, नितीन लोळगे, नितीन धनरे, प्रदीप रंगारी, नफिसखॉ पठाण, भाऊ खिल्लारे, भाऊ ठाकरे उपस्थित होते.तालुक्यातील ६४ शाळांमधील एक हजार प्रस्ताव अपेक्षित आहे. पहिल्या दिवशी ४०० प्रस्ताव दाखल करण्यात आले. तर शनिवारी उर्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लेखाधिकारी चव्हाण यांनी केले आहे. पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने मोठी गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :Teacherशिक्षक