शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:42 IST

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्दे२५ मार्चपासून प्रक्रिया : गेल्या वर्षी जम्बो बदल्या, यंदाही सहाशेपेक्षा अधिक गुरुजी बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषदशिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे.अचारसंहितेची घोषणा कोणत्याही क्षणी होणार हे लक्षात घेऊनच ग्रामविकास विभागाने जिल्हापरिषदेला ८ मार्च रोजीच बदली प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. १० मार्चपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली असली, तरी आता २५ मार्चपासून शिक्षकांना बदलीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर तत्पूर्वी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी (मॅपिंग) तयार करण्यात गुंतलेला आहे.यंदाही चार संवर्ग पाडून शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. मागील वर्षी दीर्घ प्रतीक्षेनंतर साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यंदा मात्र ही संख्या घटून सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. सेवेला दहा वर्ष झालेले शिक्षक आणि एकाच शाळेत सलग तीन वर्षे असलेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.मात्र बहुतांश शिक्षकांना गेल्यावर्षीच नवी शाळा मिळाल्याने अनेक जण तीन वर्षांचा निकष पूर्ण करीत नाही. तर ज्यांच्या सेवेला दहा वर्षे झाली, अशीही मंडळी गेल्या वर्षीच बदलीच्या ठिकाणी रुजू झाली. यामुळे यंदा बदलीपात्र शिक्षकांची संख्या हजाराच्या आतच राहण्याची शक्यता आहे.परीक्षेच्या काळात बदल्या नकोबदलीसाठी अर्च भरण्याची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र याच काळात विविध शाळांमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत. शिवाय, अनेक शिक्षकही निवडणुकीच्या कामात गुंतणार आहेत. या धावपळीत बदली प्रक्रिया राबवू नये. आचारसंहिता संपल्यानंतरच बदली प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी केली आहे. तर गेल्या वर्षी रॅण्डम राऊंडमध्ये जे विस्थापित झाले, अशा शिक्षकांना यंदाच्या बदली प्रक्रियेत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक परिषदेचे गजानन पोयाम यांनी केली आहे.आचारसंहितेच्या आधी आणि नंतरशिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आचारसंहितेपूर्वी देण्यात आले. तर प्रत्यक्ष बदलीचे आदेश मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला काढले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही बदली प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यातून सहिसलामत सुटणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक