शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:11 IST

राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे.

ठळक मुद्दे‘कम्पलसरी व्हॅकन्सी’चा खोडाअतिरिक्त शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. जिल्हा परिषद शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागा ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ म्हणून नोंदविण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने शनिवारी दिल्यामुळे आता नव्या भरतीसाठी जागा कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न डीएडधारकांपुढे उभा ठाकला आहे.तब्बल पाच वर्षानंतर शिक्षक भरतीचे सुतोवाच शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी नुकतीच डिसेंबर महिन्यात बुद्धीमत्ता आणि अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली. ही परीक्षा देणारे पावणे दोन लाख विद्यार्थी अडीच महिन्यानंतरही ‘रिझल्ट’च्याच प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे फेब्रुवारीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक पदे सहा महिन्यात भरणार असल्याचे जाहीर केले. सध्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ‘पाईपलाईन’मध्ये आहे. ती पूर्ण होताच रिक्त जागा भरल्या जातील, असा दावा केला जात आहे.१ जानेवारी रोजीच्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक आदींची तब्बल १४ हजार पदे अतिरिक्त ठरली आहेत. तर हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागांवर नवी भरती केली जाईल, अशी आशा ‘टेट’च्या परीक्षार्थ्यांना होती. त्यात आता ग्रामविकास विभागाच्या ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’च्या आदेशाने खोडा घातला आहे.या आदेशानुसार, संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, ते ज्या शाळेत अतिरिक्त ठरले आहेत, तेथील जागांवर यापुढे कोणत्याही शिक्षकांची बदली करू नये, असे आदेशात म्हटले आहे. बदली प्रक्रियेसाठी त्या जागांचे मॅपिंग करताना तेथे ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ (अनिवार्य रिक्त जागा) दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील १४ हजार शिक्षक पदे व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बंद होणाऱ्या शाळांची संख्या वाढणारशिक्षण विभागाने आधीच १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. तर आता ३० पेक्षा कमी पटांच्या शाळांची आकडेवारी गोळा करणे सुरू केले आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे संचमान्यतेचे सूत्र आहे. आता संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागाच कायमच्या रिक्त ठेवण्याचे आदेश ग्रामविकासने दिले. त्यामुळे ३० पेक्षा कमी पटाच्या शाळाही येत्या सत्रात बंद होण्याचा धोका स्पष्ट झाला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक