लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील कात्री केंद्रांतर्गत कात्री येथे शिक्षक गौरव कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घ्यावयाचा दिवस. त्यामुळे यावर्षीपासून कात्री केंद्रात शिक्षक गौरव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी आशा गट्टावार (कात्री), वनिता वानखडे (आंधबोरी) व संध्या कुकडे (बोरीमहल) या उपक्रमशील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विस्तार अधिकारी नभा सिंगलवार, ज्योती गावंडे, केंद्रप्रमुख गिरीश दुधे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विनोद क्षीरसागर, समिती अध्यक्ष प्रफुल्ल भुजाडे, शिक्षणप्रेमी पावडे गुरुजी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सारिका हजारे, भागवत चौधरी, बाबा घोडे, विशाल ठोंबरे, अरविंद झलके, अतुल बोदडे, शुभदा येवले, अनिता बरडे आदींनी परिश्रम घेतले.
कात्री केंद्रात शिक्षक गौरव कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 21:43 IST
तालुक्यातील कात्री केंद्रांतर्गत कात्री येथे शिक्षक गौरव कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घ्यावयाचा दिवस.
कात्री केंद्रात शिक्षक गौरव कार्यक्रम
ठळक मुद्देशिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घ्यावयाचा दिवस