शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

शिक्षिकेच्या कानउघाडणीमुळे इंग्रजीत वाढली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

यवतमाळ : वडील सहकार विभागात सहनिबंधक म्हणून कार्यरत असल्याने वडिलांच्या बदलीसोबतच माझ्या शिक्षणाचा प्रवास सुरू होता. पूर्वप्राथमिक शिक्षण लातूर, ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या जीवनाला आकार दिला इंग्रजी शिक्षिका व प्रशासकीय अधिकारी असलेल्या वडिलांच्या शिस्तीने

यवतमाळ : वडील सहकार विभागात सहनिबंधक म्हणून कार्यरत असल्याने वडिलांच्या बदलीसोबतच माझ्या शिक्षणाचा प्रवास सुरू होता. पूर्वप्राथमिक शिक्षण लातूर, प्राथमिक शिक्षण वर्धा, दहावी पुणे येथे तर बारावी नागपूर येथे झाले. नागपूरमध्ये सीपी अ‍ॅन्ड बेरार माध्यमिक विद्यालय होते. आमच्यावेळी इंग्रजी विषय पाचवीपासून अध्यापनाला येत असे. पहिल्याच वर्षी इंग्रजीमध्ये माझी कामगिरी अतिशय सुमार होती. ते पाहून शिक्षिका कुकडे मॅडम यांनी कानउघाडणी केली...अधिकाऱ्याचा मुलगा आहेस, सुधारणा कर! या शिक्षिकेच्या मार्गदर्शनानंतर पुढे कधीच इंग्रजी कठीण वाटली नाही, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.महाविद्यालयीन जीवनात डॉ. शरद निंबाळकर, प्रा.कॅप्टन कलंत्री, प्रा. जवाहर चरडे यासारख्या गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. घरात वडिलांची कडक शिस्त व कामात कर्तव्यतत्परता असल्याने तो गुण वारसाने प्राप्त झाला. याचाच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना वेळोवेळी लाभ होतो. कुटुंब आणि शिक्षक यांच्याकडून मिळालेले संस्कार व बाळकडू आजीवन उपयोगी ठरणारे आहे. जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास याच टप्प्यातून पूर्ण करता आला. त्यामुळेच या सर्वांचे श्रेय गुरुस्थानी असलेले वडील अण्णासाहेब गुल्हाने व शाळा-महाविद्यालयातील गुरुजनांना. आज शिक्षक दिनी त्यांना वंदन...!प्रशासकीय सेवेची प्रेरणा वडिलांकडून..माझं शिक्षण बीएससी अ‍ॅग्री आणि एमएससी हॉर्टिकल्चरमधून झाले आहे. प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा वडिलांकडून मिळाली. ते अतिशय शिस्तप्रिय व नियमाने काम करणारे होते. आपल्या अधिकाराचा कुटुंबासाठी कधीच गैरवापर केला नाही. मलाही लहानपणापासून त्यांनी स्वयंशिस्तीचे धडे दिले. याचा फायदा प्रशासकीय अधिकारी म्हणून जनतेची सेवा करताना होत आहे.आज जिल्हाधिकारी म्हणून शेतकरी-शेतमजूर यांच्यासाठी जास्तीत जास्त काम केले आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याच्या बंदीभागातील ४० गावांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरवर्षी येथील ग्रामस्थांचा निवडणुकींवर बहिष्कार राहत होता. तेथील रस्ते, आरोग्य, महसूल व शिक्षण, वनहक्कांच्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील कुमारी मातांवरही फोकस आहे. ९१ पैकी २९ कुमारी मातांना स्वयंरोजगार दिला. त्यांना स्वयंपूर्ण करणे, घरकुल देणे, यासाठी प्रयत्नरत आहे. प्रत्येक तालुक्याला महिला नोडल अधिकारी नेमले आहेत.सर्व क्रीडा प्रकारात विशेष रुची...शालेय जीवनापासूनच क्रीडा प्रकारामध्ये विशेष रुची होती. स्विमिंगवर आजही जीवापाड प्रेम आहे. टेबल टेनिस टीमचा महाविद्यालयात कर्णधार होतो. ज्युडोतही विदर्भस्तरीय स्पर्धेत सहभाग होता. बॉक्सींगमध्येही महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धेत भाग घेतला. आता हाफ मॅरॉथॉनमध्ये सहभाग आहे. २१ किलोमीटरपर्यंतच्या चार अर्ध मॅरॉथॉन पूर्ण केल्या आहे. आजही क्रीडा प्रकारात स्वारस्य असून वेळ मिळाला तसा सहभाग घेतो.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन