शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकांना शाळेबाहेर काढून गावकरी घेताहेत वर्ग

By रवींद्र चांदेकर | Updated: March 27, 2023 21:13 IST

महागाव ( यवतमाळ ) : तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांमधील अंतर्गत बेबनाव व विसंवाद विकोपाला ...

महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांमधील अंतर्गत बेबनाव व विसंवाद विकोपाला गेला. या वादात शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या हजेरी बुकाची पाने फाडली. एवढेच नाही, तर तीन दिवसांपासून हजेरी बुक गहाळ केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा सुरू झाला. या वादाची वाच्यता गावभर झाल्यानंतर पालक व गावकऱ्यांनी शाळेवर धडक दिली.

संतप्त गावकऱ्यांनी शाळेतील चारही शिक्षिकांना शाळेत येण्यास प्रतिबंध घातला. पालकांनी शाळेचा ताबा घेतला. आता पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेच्या आवारात, तर चारही शिक्षिका शाळेच्या कंपाउंडबाहेर बसत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शाळेतील चारपैकी एक शिक्षिका माजी आमदारांची पत्नी आहे, हे विशेष. 

शिक्षिकांमध्ये काही कारणावरून कलह निर्माण झाला. त्यांच्या भांडणात हजेरी बुक फाडून गायब करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार पालकांच्या कानी घातला. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती  आणि पालकांनी शाळेचा कारभार हाती घेतला. स्वयंसेवकांच्या साहाय्याने वर्ग सुरू ठेवून चारही शिक्षिकांना बाहेर बसविण्याचा निर्णय घेतला. आता स्वयंसेवक वर्गात, पालक शाळेच्या प्रांगणात आणि शिक्षिका शाळेबाहेर अशी अजब परिस्थिती निर्माण झाली आहे.बीईओंनी नेमली चौकशी समितीगावकऱ्यांनी घटनेची तक्रार शिक्षण विभागाकडे केली. नंतर गटशिक्षणाधिकारी मारोती मडावी यांनी चौकशी समिती नेमली. समितीत शिक्षण विस्तार अधिकारी रामकृष्ण बगाडे, गोपाल कटकमवार यांचा समावेश आहे. त्यांनी साेमवारी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, मुख्याध्यापिका चौकशी समितीसमोर आल्या नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा