शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘वायपीएस’मध्ये शिक्षक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:24 IST

शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत असतात. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे, याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत असतात. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे, याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या जातात. याच अनुषंगाने ‘टीम बिल्डींग’ (संघाची एकता) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेसीस कॉटन सिटी क्लबच्या माजी अध्यक्ष निशा चांडक लाभल्या होत्या. सध्या त्या मुंबई येथे कार्यरत आहे. त्यांना राष्ट्रीय श्रेष्ठ वक्ता हा पुरस्कार दोनदा प्राप्त झाला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात निरंतर होणाऱ्या बदलाला समजून आणि त्यादृष्टीकोनातून स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक झालेले आहे. याच विषयावर निशा चांडक यांनी मार्गदर्शन केले.शिक्षकांना संघाची एकता, त्याचे महत्त्व, त्यापासून होणारे सकारात्मक बदल निशा चांडक यांनी समजावून सांगितले. शैक्षणिक क्षेत्रात होणारे बदल कशा प्रकारे स्वीकारले जाऊ शकते, समुहाने कार्य करत असताना निर्माण होणाºया अडचणी कशा पद्धतीने दूर केल्या जाऊ शकतात याविषयी त्यांनी माहिती दिली. आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवा, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपले समजून यशाच्या शिखराकडे न्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यशाळेचे संचालन रूक्साना बॉम्बेवाला यांनी केले. आभार अर्चना कढव यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले.

टॅग्स :Schoolशाळा