शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघर्ष समितीचा सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:29 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या र्आनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता झाली. चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकाच विषयाकरिता दोन शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्त करण्यात आले.

ठळक मुद्देबदली आंदोलन : शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या र्आनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता झाली. चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकाच विषयाकरिता दोन शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्त करण्यात आले. यासह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या शिक्षकांनी शिक्षक संघर्ष समितीच्या नेतृत्वात बुधवारी तिरंगा चौकात सत्याग्रह आंदोलन सुरू केले.जिल्हा परिषदेने सहाय्यक शिक्षक, विषय शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक आदींच्या बदल्या केल्या. यात २०० च्यावर शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. यामुळे विस्थापित शिक्षकांना त्यांचे विकल्प मिळाले नाही. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतरही संवर्गनिहाय्य याद्या आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाºया शिक्षकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे शिक्षक संघर्ष समितीने बदली यादी प्रसिद्ध करण्याची मागणी लावून धरली आहे.३० किलोमीटर अंतरावरील पती-पत्नी एकत्रीकरण झाले नाही. समान तत्व वापरले गेले नाही. बदलीपूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे गरजेचे होते. त्यांचे समायोजन झाले नाही. त्या शिक्षकांच्या आता बदल्या करण्यात येत आहे. विकल्पातील २० गावांमध्ये बदली दिली जाणार होती. यातील पाच ते सहा गावे रिक्त असताना शिक्षकांना त्या ठिकाणी बदली मिळाली नाही. एकट्या यवतमाळ तालुक्यात अशा १५० च्यावर तक्रारी आहे. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बदलीग्रस्त शिक्षक संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. ज्ञानेश्वर नाकाडे, रमाकांत मोहरकर, प्रमोद कांबळे, गजानन पोयाम, पुंडलिक बुटले, मंगेश फुटाणे, कपिल गुंठेवार, शशिकांत लोळगे, रवींद्र कोल्हे, महेंद्र वेरूळकर, अतुल खासरे, नीलेश पत्तेवार, गजानन उत्तरवार, नीलेश ठाकरे, विजय ठाकरे, संजय राऊत, प्रकाश सालपे, संध्या जाधव, पुष्पा तायडे, वैशाली तिजारे, सुनिता काळे, कल्पना गोदमले, प्रतिभा मलकापुरे, अर्चना होलके यांच्यासह अनेक शिक्षक आंदोलनात सहभागी आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक