शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी मिळाली शिक्षकाला बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र जोगमोडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागने २५ मार्च बढती दिली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांसाठी मुख्याध्यापक झाले. जिल्हा परिषदेने तब्बल २०० शिक्षकांच्या बढतीचे आदेश २९ मार्चला निर्गमित केले. २१ मार्चला पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक राज सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या हक्काची बढती दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णी तालुक्यातील लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकांना निवृत्तीच्या केवळ दोन दिवस आधी मुख्याध्यापकपदी बढती मिळाली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांचे मुख्याध्यापक ठरले. अगदी नायक सिनेमातील हा प्रकार जिल्हा परिषदेने प्रत्यक्षात आणला.लोणबेहळ जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र जोगमोडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागने २५ मार्च बढती दिली. त्यामुळे ते केवळ दोन दिवसांसाठी मुख्याध्यापक झाले. जिल्हा परिषदेने तब्बल २०० शिक्षकांच्या बढतीचे आदेश २९ मार्चला निर्गमित केले. २१ मार्चला पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक राज सुरू झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या हक्काची बढती दिली.  २०१७ पासून शिक्षकांच्या बढत्या रखडल्या होत्या. गेल्या पाच वर्षांपासून विविध शिक्षक संघटना प्रमोशनसाठी प्रयत्नरत होत्या. मात्र, कायद्याचा आधार घेत उणीवा काढून आडकाठी निर्माण केली जात होती. अनेक शिक्षक तर बढती न मिळताच सेवानिवृत्त झाले. त्यामुळे प्रशासक राज सुरू होताच पुन्हा एकदा शिक्षकांच्या प्रमोशनचा मुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांना कार्यवाहीचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी संपूर्ण कागदपत्रे तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. नंतर अवघ्या पाच दिवसांत १९४ प्राथमिक शिक्षक, १७ माध्यमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती देण्यात आली.  यापैकी अनेकांची सेवानिवृत्ती काही महिन्यांच्या उंबरठ्यावर आली आहे. 

शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदेही भरली- माध्यमिकचे चार पर्यवेक्षक, माध्यमिकचे एक उपमुख्याध्यापक, तसेच प्राथमिकच्या १४ शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागल्याने शिक्षकांनी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आभार मानले. शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याबद्दल शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी सीईओंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद