शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

‘टीडीएस’ कपात बँकेला भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:35 PM

ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिला आहे.

ठळक मुद्देग्राहक न्यायालय : महाराष्ट्र बँकेविरूद्ध महिलेची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ठेवीच्या रकमेतून ‘टीडीएस’ची परस्पर कपात महाराष्ट्र बँकेच्या वणी शाखेला भोवली. जिल्हा ग्राहक न्यायालयाने या बँकेला चपराक दिली आहे. वणी येथील मजूर महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे यांनी निर्णय दिला आहे.वणी येथील सम्राट अशोक नगरातील रमा गौतम कांबळे यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या वणी शाखेत मुलीच्या नावाने २ लाख रुपयाची गुंतवणूक केली होती. मुदतीअंती त्यांना तीन लाख ८१ हजार ११२ रुपये मिळणार होते. मात्र बँकेने ३ लाख १४ हजार २४९ रुपयेच रमा कांबळे यांच्या बँक खात्यात जमा केले. मुदती अंती मिळणारी पूर्ण रक्कम प्राप्त न झाल्याने त्यांनी बँकेशी संपर्क केला. त्यावेळी त्यांना १५ जी फॉर्म न भरल्याने दरवर्षी ‘टीडीएस’ची रक्कम कपात केल्याचे सांगण्यात आले.फॉर्म भरण्याविषयी बँकेने कांबळे यांना कोणतीही माहिती दिली नाही. ६६ हजार ८६३ रुपये एवढी रक्कम कपात झाल्याने न्यायासाठी त्यांनी जिल्हा ग्राहक मंचायत धाव घेतली. बँकेतर्फे याप्रकरणात कुणीही हजर झाले नाही. त्यामुळे प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले. रमा कांबळे यांची मुलगी अज्ञान आहे. तिच्या नावाने असलेल्या मुदत ठेवीच्या रकमेवर ‘टीडीएस’ची कपात उचित नाही व पूर्णपणे गैरकायदेशीर आहे असे मंचाने आदेशात म्हटले आहे. बँकेने कांबळे यांना ‘टीडीएस’ पोटी कपात केलेली रकम सव्याज द्यावी व मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार रुपये व तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये असा आदेश दिला आहे.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रYavatmalयवतमाळ