लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. एकही कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. शिवाय कार्यालयीन वेळेतही येथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहात नसल्याचे दिसून येते. सोमवारी दुपारी कार्यालयात पूर्णत: शुकशुकाट होता. महत्त्वपूर्ण दस्तावेज, यंत्रणा अक्षरश: बेवारस होती.कळंब बांधकाम विभागात उपअभियंता अनिल तोडे कार्यरत आहे. त्यांच्या अधिनस्तच येथील यंत्रणा काम करते. मात्र येथील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने मनमर्जी कारभार सुरू आहे. खुद्द उपअभियंताच यवतमाळवरून येथील कारभार हाकतात. शासकीय वाहनांचा वापरही वैयक्तिक कामासाठी होतो. लॉगबूकमध्येही चुकीच्या नोंदी घेण्यात येतात. अशीच स्थिती इतर कर्मचाऱ्यांची आहे. वरिष्ठच नियमित नसल्याने कर्मचारीही आपल्या सोयीने कार्यालयात वेळ देत आहे. सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेण्याची तसदी येथील अभियंते दाखवित नाही. सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. काही अपवाद वगळता एकही जबाबदार अधिकारी येथे उपलब्ध नसतो. हा प्रकार किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मी तीन दिवस सुटीवर होतो. परंतु येत्या काळात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. कार्यालयीन वेळेत प्रत्येकाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.- अनिल तोडे, उपअभियंता, कळंब
कळंब बांधकामचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST
कळंब बांधकाम विभागात उपअभियंता अनिल तोडे कार्यरत आहे. त्यांच्या अधिनस्तच येथील यंत्रणा काम करते. मात्र येथील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने मनमर्जी कारभार सुरू आहे. खुद्द उपअभियंताच यवतमाळवरून येथील कारभार हाकतात. शासकीय वाहनांचा वापरही वैयक्तिक कामासाठी होतो. लॉगबूकमध्येही चुकीच्या नोंदी घेण्यात येतात.
कळंब बांधकामचा कारभार रामभरोसे
ठळक मुद्देकार्यालय वाऱ्यावर : कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी, नागरिकांना होतोय त्रास