शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

भक्तांना ऊर्जा देणारे ‘तपोनेश्वर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य पहायला मिळतात. याची रचना अखंड दगडांपासून करण्यात आली आहे. आतील बाजूने त्यावर सुंदर कलाकु सर आहे. त्यावर देवी, देवता आणि विविध कलाकृती पहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. नंदीवर हाताने थाप मारताच त्यातून प्रतिध्वनी कंपित होतो.

ठळक मुद्देप्रतिध्वनी येणारा नंदी : पुरातत्त्व विभागाकडे देखरेखीची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शिवालयं भक्तांना मोहित करणारे आहेत. प्रत्येक मंदिराची अद्भूत कलाकृती आहे. दारव्हा तालुक्यातील तपोनेश्वर हे त्यातीलच एक आहे. श्रावण महिना कोरोनाच्या सावटात आहे. यामुळे मंदिरात शिवभक्तांची गर्दी नाही. मात्र मनात शिवनामाचा अखंड जप सुरू आहे. विदर्भाच्या विविध भागातील भक्त याठिकाणी दर्शनाला येतात.तपोनेश्वरचे मंदिर पूर्वी घनदाट जंगलात होते. आता या ठिकाणी मानवी वस्ती आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये हे मंदिर आहे. सर्वच मंदिराची एकसारखी कलाकृती आहे. पुरातत्व विभागाने हे मंदिर आपल्या देखरेखीत घेतले आहे.या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य पहायला मिळतात. याची रचना अखंड दगडांपासून करण्यात आली आहे. आतील बाजूने त्यावर सुंदर कलाकु सर आहे. त्यावर देवी, देवता आणि विविध कलाकृती पहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. नंदीवर हाताने थाप मारताच त्यातून प्रतिध्वनी कंपित होतो.शिवालयाच्या बाजूला जलकुंड आहे. जलकुंडातील पाणी वाढताच शिवालयातील मूर्ती जलमय होते. कितीही पाणी बाहेर काढले तरी या ठिकाणी पुन्हा संचय होतो. अशी अद्भूत रचना त्या काळात करण्यात आली आहे. शिवालयात एक कक्ष निर्माण केलेला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीला सहज बसता येईल, अशी संपूर्ण व्यवस्था आहे.शिवालयाच्या बाजूला आजही चिरेदार शिळा पहायला मिळतात. या ठिकाणी वर्षभर भक्तांची गर्दी पहायला मिळते. श्रावणात भक्तांची प्रचंड वर्दळ परिसरात असते. यात्रेचे स्वरूप या ठिकाणी असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे अनेक बंधन आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक