शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिने अधिक घ्या; टायपिंगचा स्पीड वाढवा, एप्रिलची परीक्षा जूनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 09:03 IST

ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या सत्रातील विद्यार्थ्यांची संगणक टायपिंग परीक्षा १ ते १५ एप्रिलदरम्यान नियोजित होत्या.

यवतमाळ : निवडणुकीच्या कामाचा प्रशासनावर ताण वाढला आहे. त्यामुळे राज्यात एप्रिलमध्ये होणाऱ्या टायपिंग परीक्षा तब्बल दोन महिने लांबविण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जूनमध्ये घेतल्या जाणार असल्याचे परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल दीड लाख विद्यार्थ्यांना सरावासाठी आणखी वाढीव वेळ मिळणार आहे. 

ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या सत्रातील विद्यार्थ्यांची संगणक टायपिंग परीक्षा १ ते १५ एप्रिलदरम्यान नियोजित होत्या. या परीक्षेसाठी राज्यभरात एकूण १ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत. परंतु, याचदरम्यान परीक्षा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तसेच शिक्षण विभागातील अन्य अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. 

कर्मचारी नाहीत परीक्षेकरिता कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले. इतर परीक्षांमुळे लॅब आरक्षित असल्याने परिषदेने टंकलेखन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  १० जूनपासून इंग्रजीच्या तर १८ जूनपासून मराठी, हिंदीच्या संगणक टायपिंग परीक्षा होतील. लघुलेखन परीक्षा जिल्हास्तरावर २० ते २३ जूनदरम्यान होतील, तर मॅन्युअल मशीन टायपिंग परीक्षा ७ व ८ जूनला होणार असल्याचे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी जाहीर केले आहे. 

अर्ज भरण्यासाठीही वेळदरम्यान, परीक्षेचा लांबविलेला कालावधी लक्षात घेता परिषदेने नियमित व रिपीटर विद्यार्थ्यांनाही परीक्षेचा अर्ज भरता यावा, यासाठी वाढीव वेळ दिला आहे. त्यानुसार, नोंदणीची लिंक १५ ते २५ एप्रिल या कालावधीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या निर्णयामुळे सरावासाठी वाढीव वेळही मिळणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंद आहे. परंतु, संस्थाचालकांसाठी निर्णय त्रासदायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया राज्य संघटनेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी कैलास जगताप यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षा