शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

भीमा नदीच्या तिरी उभा हा विजयस्तंभ ताजा

By admin | Published: January 04, 2016 4:34 AM

अशा शौर्यगीतांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाला भीमदास नाईक यांच्या स्वरांनी उजाळा दिला. ‘भीम पहाट’ या महार

यवतमाळ : भीमा नदीच्या तिरी उभा हा विजयस्तंभ ताजामानवंदना कराया जाई बाप भीम हा माझा।।अशा शौर्यगीतांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाला भीमदास नाईक यांच्या स्वरांनी उजाळा दिला. ‘भीम पहाट’ या महार रेजिमेंटच्या शूरवीरांची शौर्यगाथा सांगणारा कार्यक्रम १ जानेवारीला बोधिसत्त्व बुद्धविहारात पार पडला. १ जानेवारी १८१८ ला पुण्याजवळील भीमा नदीच्या तीरावर ५०० महार रेजिमेंटच्या सैनिकांनी प्रतिगामी शक्तीचा शिरच्छेद केला होता. तो इतिहास उजागर करण्यासाठी भारिप बहुजन महासंघातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. भीमा कोरेगाव येथील स्तंभाची प्रतिकृती तयार करून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे यांच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षातर्फे समाजहित जोपासणारे कार्यक्रम घेण्याची हमी दिली. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल चुनारकर, खंडेश्वर कांबळे, अ‍ॅड.अरुणा तेलंग, अर्चना कोचे, सुरेखा कांबळे आदींची उपस्थिती होती. भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांसोबतच समाजातील हजारोंचा जनसमूदाय या कार्यक्रमास उपस्थित होता.कुणाला नशा दारूची, कुणाला नशा कशाचीआम्हाला नशा बुद्धगया व सारनाथचीया गीताने तर गायक भीमदास नाईक यांनी उपस्थित जनसमूदायाला भारावून टाकले व त्याच गीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमासाठी अ‍ॅड.संजीवकुमार इंगळे, गुणवंत मानकर, निरंजन खडसे, केशव भागवत, पद्माकर घायवान, धनंजय गायकवाड, ईश्वर तायडे, विशाल पोले, कुंदन नगराळे, प्रसेनजीत भवरे, अशोक कुटेमाटे, सुधाकर देवरे, वासुदेव भारसाकडे, जगन्नाथ सिरसाट, शंकर तायडे, वासुदेव मानकर, जीवन काळपांडे, शाम नागरिकर, बादल पेटकर, प्रमोद पाटील, किशोर उके, सचिन नगराळे, सागर डोमे, सुरज धोंगडे, कुणाल डोमे, सिद्धार्थ तेलंग, राजू डोये, किशोर नन्नावरे, संदीप वाघमारे, सचिन बागेश्वर, रूपेश राऊत, कपिल रामटेके, राहुल राऊत, नितेश पाटील, सुदर्शन घोडेस्वार, शुभम गणवीर, सागर मेश्राम, गजू थोरात, नीलेश गायकवाड, किशोर कापशीकर, कुणाल खडसे, मनोज रामटेके, किशोर पाटील, बुद्धकिरण कांबळे, सुरेश रामटेके आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)