शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

टी-१ वाघीण मृत्यू प्रकरण; वनअधिकारी व कर्मचाऱ्यांची सहा तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 5:42 PM

पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली.

ठळक मुद्देइनकॅमेरा नोंदविले बयाण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा - टी-१ अवनी वाघिणीच्या मृत्यू चौकशी संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समितीने बोराटी जंगलात घटनास्थळावर जावून तब्बल सहा तास चौकशी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शार्पशुटर अजहरअली खान याचीही चौकशी करण्यात आली.संपूर्ण देशाचे लक्ष लागून असेल्या टी-१ या वाघिणीला २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास बोराटी जंगलातील पुलाजवळ शार्पशुटर अजहरअली खान याने गोळी घालून ठार केले. तेव्हापासून या घटनेचा वन्यजीवप्रेमी व काही राजकीय नेत्यांनी निषेध करणे सुरू केले. वनमत्र्यांसह संपूर्ण शासनाला विरोधकांनी धारेवर धरले. त्यामुळे या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्यावतीने तीन सदस्यीय समिती गठीत केली. ही समिती मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास थेट टी-१ वाघिणीला ज्याठिकाणी ठार मारण्यात आले, त्याठिकाणी गेली. त्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या या तीन सदस्यीय समितीमध्ये सेवानिवृत्त अ‍ॅडिशनल पीसीए ओ.पी.कालर, वन्यजीव नियंत्रण व्याघ्र विभागाचे उपसंचालक जोस लुइस व एनटीसीचे सहाय्यक महानिरीक्षक या तिघांचा समावेश आहे. या समितीने घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर पांढरकवडा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. शार्पशुटर नवाब शहाफत अली खान याचा मुलगा अजगर अली याचीसुद्धा चौकशी करण्यात आली. वाघिणीला प्रथम ट्रँक्युलाईझ करण्यात आले की नाही, थेट गोळ्याच घालण्यात आल्या की काय, याबाबत वनसमितीने सखोल चौकशी केली. दिल्ली येथून आलेल्या या चौकशी समितीने घटनास्थळावर दुपारी १ ते ६ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास चौकशी केली. त्यानंतर लोणी येथील बेस कॅम्पमध्ये येऊन त्यांनी सर्व कागदपत्रांची, पंचनाम्याच्या प्रतीची तपासणी केली. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास ही समिती पांढरकवडा येथे आली. विश्रामगृहावर मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळीच उमरीच्या विश्रामगृहावर गेली. त्याठिकाणी काही संबंधितांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर परत ही समिती घटनास्थळावर गेली.राज्य शासनाची समिती १७ नोव्हेंबरला येणारराज्य शासनातर्फे अवनी टी-१ वाघिणीच्या मृत्यू संदर्भात चारजणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीत प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील, वन्यजीव विभागाचे डॉ.बिलाल हबीब, अनिश अंधेरिया, सहाय्यक मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा समावेश आहे. ही समिती येत्या १७ नोव्हेंबरला चौकशीसाठी घटनास्थळावर येणार आहे.

टॅग्स :Tigerवाघ