स्वाभिमानी नितीनची प्रेरणादायी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:17+5:30

नितीन एक वर्षाचा असताना आजारी पडला. पालकांनी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी आजार दुरुस्त होण्याऐवजी नितीन संपूर्ण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्याचे एक हात आणि दोन पाय निकामी झाले. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्यापुढील समस्या वाढत गेल्या. खाणे, पिणे, चालणे या सर्व कृती करताना होणारा त्रास त्याला असह्य होत होता.

Swabhimani Nitin's inspiring push | स्वाभिमानी नितीनची प्रेरणादायी धडपड

स्वाभिमानी नितीनची प्रेरणादायी धडपड

Next
ठळक मुद्देपिंपळगावचा युवक : कृत्रिम हातापायावर सोडवितो रोजीरोटीचा प्रश्न

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : धडधाकट असूनही दारोदार फिरून भीक्षा मागणारे आणि रोजगार नसल्याचे रडगाने सांगणारे माणसं आज सर्वत्र दिसतात. मात्र पिंपळगाव डुब्बा येथील नितीन विठ्ठल दाबेकर या २६ वर्षीय युवकाची धडपड प्रेरणादायी अशी आहे. एक हात आणि दोन पाय कृत्रिम असतानाही जगण्याचा खरा मंत्र त्याने दिला आहे.
नितीन एक वर्षाचा असताना आजारी पडला. पालकांनी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी आजार दुरुस्त होण्याऐवजी नितीन संपूर्ण आयुष्यभरासाठी दिव्यांग झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने त्याचे एक हात आणि दोन पाय निकामी झाले. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्यापुढील समस्या वाढत गेल्या. खाणे, पिणे, चालणे या सर्व कृती करताना होणारा त्रास त्याला असह्य होत होता.
जगण्याची धडपड आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी त्याने निवडलेला मार्ग प्रत्येक दिव्यांग आणि धडधाकटांसाठी ऊर्जेचा स्रोत बनला आहे. कृत्रिम हात-पाय बसविले. यातून त्याची स्वाभिमानाने जगण्याची उमेद बळावली. पिंपळगावात राहूनच तो सुतार काम करतो. लाकडापासून विविध शेतीपयोगी वस्तूला आकार देतो.

कुटुंबाची साथ
विवाहित असलेल्या नितीनचा मुलगा, मुलगी असा चार जणांचा परिवार आहे. नियतीने लादलेले अपंगत्व त्याच्यासाठी दु:खाची बाब आहे. मात्र जिद्द आणि चिकाटीची साथ आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मिळत असलेले पाठबळ ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. आयुष्यातील पावलोपावली येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कुटुंबीयाकडून मिळणारी साथच त्याची ताकद बनली आहे. नितीनची वाटचाल इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे.

Web Title: Swabhimani Nitin's inspiring push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.