शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बाबाचा शंकास्पद मृत्यू, तरी मुलगा परीक्षेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

शुक्रवारी त्याने मुलासोबत तलावामध्ये जाऊन मासोळ्या पकडल्या. त्यानंतर कळंब येथे मासोळी विकण्यासाठी तो अंकीतसोबत आला. दरम्यान दाढ दुखत आहे म्हणून सायंकाळी तो डॉ. देवयानी काळे यांच्या दवाखान्यात गेला. डॉ. काळे यांनी त्याच्या दाढेत इंजेक्शन लावले. इंजेक्शन लावताच चिंतामणच्या तोंडातून फेस आला आणि तेथेच तो निपचित पडला.

ठळक मुद्देकळंब येथील प्रकार । आधी दिला पेपर, नंतर मृतदेह घेऊन एसपी कार्यालयावर

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गरीब मासोळी विक्रेत्याचा रुग्णालयात अवघ्या दहा मिनिटात संशयास्पद मृत्यू झाला. सारे नातेवाईक डॉक्टरला घेरून पोलीस ठाण्यात धडकले. नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टमार्टेमसाठी मृतदेह नेला. तेथून एसपी कार्यालयावर न्यायासाठी धडक दिली. अन् या सर्व धावपळीत न्याय मागत फिरतानाही मृताचा मुलगा मात्र मनात दहावीच्या परीक्षेचा विचार कायम ठेवून होता. वडिलांचे पोस्टमार्टेम सुरू असतानाच त्याने भूमितीचा पेपरही मन लावून सोडविला. या प्रकाराने कळंबची पंचक्रोशी शनिवारी विचारमग्न झाली.मृत इसमाचे नाव चिंतामण श्रावण शिवरकर (४५) असे असून तो तालुक्यातील मांजरवघळ येथील रहिवासी आहे. शुक्रवारी त्याने मुलासोबत तलावामध्ये जाऊन मासोळ्या पकडल्या. त्यानंतर कळंब येथे मासोळी विकण्यासाठी तो अंकीतसोबत आला. दरम्यान दाढ दुखत आहे म्हणून सायंकाळी तो डॉ. देवयानी काळे यांच्या दवाखान्यात गेला. डॉ. काळे यांनी त्याच्या दाढेत इंजेक्शन लावले. इंजेक्शन लावताच चिंतामणच्या तोंडातून फेस आला आणि तेथेच तो निपचित पडला.या प्रकाराने घाबरून डॉ. देवयानी काळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चिंतामणला तातडीने आॅटोतून कळंब ग्रामीण रुग्णालयात परस्पर दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अगदी ठणठणीत दवाखान्यात आलेले बाबा अचानक कसे मृत झाले, या अंकीतच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तेथे कोणीही तयार नव्हते. त्यानंतर रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी कळंब पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.त्यामुळे कुटुंबीयांनी कळंब येथे शवविच्छेदन करण्यास विरोध करुन मृतदेह यवतमाळ येथे हलविला. तर या सर्व दु:खात, गडबडीतही अंकित हा मुलगा दहावीचा पेपर देण्यासाठी कळंबच्या परीक्षा केंद्रात गेला. भूमितीचा पेपर मन लावून सोडविला आणि तडक यवतमाळात धडकला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर सरळ मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर नेला. तेथे तक्रार व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कळंब येथे तक्रार द्या, नियमानुसार कारवाई केली जाईल, अशा शब्दात पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर मृतदेह मांजरवघळ येथे नेण्यात आला. तेथे पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रकरणी मृताची पत्नी रुपाली यांनी डॉ. देवयानी काळे या आपल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार दिली. दरम्यान डॉ. देवयानी काळे दवाखाना बंद करुन कुठेतरी निघून गेल्याची माहिती आहे. मृताच्या मागे पत्नी, मुलगी किरण (१८), मुलगा अंकीत (१६), निखिल (१४) असा परिवार आहे.मृताच्या पत्नीने तक्रार दाखल केली. नियमानुसार तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.- विजय राठोड, ठाणेदार, कळंब.

टॅग्स :Deathमृत्यू