शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्राध्यापकांच्या बदल्यांना स्थगिती; नागपूर ‘मॅट’चा निर्णय

By सुरेंद्र राऊत | Updated: July 18, 2023 17:48 IST

बदली प्रक्रियेवर ओढले ताशेरे

यवतमाळ : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेप घेत यवतमाळ मेडिकलच्या प्राध्यापकांनी नागपूर ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. प्राध्यापकांची बाजू ऐकून घेत बदली प्रक्रियेला ८ ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश ‘मॅट’ने दिला. तसेच राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षक व संशोधन संचनालयाचे संचालक, संबंधित वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना लेखी जबाब सादर करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्र प्रशासकीय लवाद नागपूर खंडपीठात वैद्यकीय प्राध्यापकांनी याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायाधीश एम.ए. लव्हेकर यांच्याकडे प्राध्यापकांचे वकील ॲड. संदीप मराठे यांनी युक्तिवाद केला. ही बदली प्रक्रिया कशी चुकीची आहे, हे ‘मॅट’ च्या निदर्शनास आणून दिले. प्राध्यापकांच्या बदल्या करताना शासन आदेश ९ एप्रिल २०१८ यातील सूचना व निर्देशाचे पालन केले नसल्याचा ठपका ‘मॅट’ ने ठेवला. पुढील आदेशापर्यंत वैद्यकीय प्राध्यापकांच्या बदल्या करू नये असे स्पष्ट केले.

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय पोटे, डॉ. गौतम खाकसे, डॉ. पाशू शेख, डॉ. जय राठोड यांनी याचिका दाखल केली होती. यासह चंद्रपूर, नागपूर, अकोला येथील वैद्यकीय प्राध्यापकांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर येथील वैद्यकीय प्राध्यापकांना बदली आदेशानंतर तेथील अधिष्ठातांनी कार्यमुक्त केले होते. आता ‘मॅट’ च्या आदेशामुळे या ठिकाणचे सहयोगी प्राध्यापक पुन्हा रुजू होत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यcollegeमहाविद्यालयTransferबदलीYavatmalयवतमाळ