शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रांना बुरशी लागलेल्या औषधीचा पुरवठा; अमरावती येथील पुरवठादार कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:37 IST

तीन आरोग्य केंद्रांकडून अहवाल: औषधांचे 'एफडीए'कडे नमुने

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्यात सरकारी पुरवठादार असलेल्या औषधी कंपन्यांकडून गुणवत्ता नसलेली औषधी पुरविण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नागपूर त्यानंतर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असा प्रकार उघडकीस आला. लाखो रुग्णांना ही औषधी देण्यात आली. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या कॅल्शियम सिरपला बुरशी लागल्याचे उघड झाले आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. 

जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून औषधी वितरण केले जाते. शासनस्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादार कंपन्या ही औषधी देतात. अपवादात्मक परिस्थिती स्थानिक पातळीवर खरेदीचा निर्णय होतो. पुरवठादार कंपनीने दिलेली औषधी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व तेथून प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात येतात. ग्रामीण भागात महिला व मुलांमध्ये तसेच वृद्धांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळून येते. यासाठी त्यांना गोळी व सिरपच्या माध्यमातून कॅल्शियम देण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्लायसीकॅल-बी १२ हे सिरप पाठविण्यात आले. ग्लासीअर फार्मास्युटिकल्स प्रा.लि. अमरावती या कंपनीकडून हे सिरप पुरविण्यात आले. या सीलबंद औषधाला बुरशी लागल्याचे निदर्शनास आले. या सिरपचा बॅच क्र. क्यूएल ०६०१, क्यूएल ०६०३ असा आहे. ६ जून २०२४ मध्ये हे औषध तयार झाले असून याची एक्सपायरी मे २०२६ पर्यंत आहे. ३२९ सीलबंद बॉटल्स बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्या. 

जिल्ह्यातील खैरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव (ता. कळंब), अकोला बाजार (ता. यवतमाळ), घारफळ (ता. बाभूळगाव) या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हा प्रकार निदर्शनास आला आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांना दिली आहे. याबाबत अजून चौकशी झालेली नाही. या बॅचचे सिरप इतर कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर, उपकेंद्रावर पोहोचले आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे झाले आहे. 

'त्या' औषधांचे 'एफडीए'कडे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बुरशी आढळून आलेल्या कॅल्शियम सिरपचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालया- कडून देण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात या औषधांचा पुरवठा झाला होता. अन्न व औषधी प्रशासन विभागाने या सिरपचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई होईल.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ