शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

क्षणिक रागातून मातेची चिमुकल्यासह विहिरीत आत्महत्या

By admin | Updated: December 9, 2014 22:57 IST

क्षुल्लक कारणावरून पतीसोबत झालेल्या वादात क्षणिक रागातून एका मातेने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरानजीकच्या भोसा परिसरात

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून पतीसोबत झालेल्या वादात क्षणिक रागातून एका मातेने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरानजीकच्या भोसा परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. अर्चना शांताराम राऊत (३०) आणि निधी शांताराम राऊत (१) रा. महाजन ले-आऊट भोसा असे मृत माय-लेकीची नावे आहेत. शांताराम राऊत हा मोलमजूरी करून कुटुंबाचा गाडा ओढत होता. मात्र गेल्या महिनाभरापासून त्याच्या हाताला कामच नव्हते. त्यामुळे पत्नी अर्चना आणि शांताराममध्ये खटके उडत होते. घटनेच्या दिवशी याच कारणावरून वाद झाला. शांताराम पैशाची व्यवस्था करण्यासाठी घाटंजी येथील बहिणीकडे निघून गेला. दरम्यान सोमवारी रात्री तो घरी आला. मात्र पत्नी अर्चना आणि मुलगी निधी दिसली नाही. शेजाऱ्यांकडे चौकशी केली, रात्रभर शोध घेतला परंतु थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू झाली. त्यावेळेस कुणीतरी अर्चना मुलीला घेऊन एका शेतातील विहिरीकडे गेल्याचे सांगितले. त्यामुळे शांतारामने स्थानिक नागरिकांसह विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी मायलेकींचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती परिसरात होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. वडगाव रोड पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तुर्तास या प्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेण्यात आली. शांतारामचा यापूर्वी २००७ मध्ये विवाह झाला होता. मात्र त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याने मुळची आकोट येथील अर्चनाशी विवाह केला. हे दोघे जण भोसा परिसरातील महाजन ले-आऊटमध्ये राहात होते. त्यांना एक मुलगी झाली. गेल्या १८ नोव्हेंबर रोजी या दोघांनी मुलगी निधीचा वाढदिवस उत्साहात साजराही केला, तिचा हा पहिला वाढदिवसच क्षणिक रागातून मातेने घेतलेल्या निर्णयाने अखेरचा ठरला. क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेने भोसा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. दरम्यान उत्तरीय तपासणीनंतर दोघींचेही मृतदेह शांताराम राऊत यांच्या सुपूर्द करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)