शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीची दहावीत बाजी, हिवराच्या समीक्षाला मिळाले ९६.२० टक्के गुण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 20:11 IST

आर्थिक विवंचनेने वडिलांनी दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली. संपूर्ण कुटुंब खचून गेले. आईने धीराने तीनही मुलींना शिकविले.

- विजय बोंपीलवार हिवरासंगम (यवतमाळ) : आर्थिक विवंचनेने वडिलांनी दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली. संपूर्ण कुटुंब खचून गेले. आईने धीराने तीनही मुलींना शिकविले. आईच्या कष्टाचे चीज करीत तीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९६.२० टक्के गुण घेतले. समीक्षा सुधाकर आंडगे असे या गुणी विद्यार्थिनीचे नाव असून ती महागाव तालुक्यातील हिवरासंगमची आहे.समीक्षाचे वडील सुधाकर आंडगे यांनी दहा वर्षापूर्वी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यावेळी समीक्षा पहिल्या वर्गात शिकत होती. वडिलांचे पितृछत्र हरविल्यानंतर या तीनही मुलींचा सांभाळ आई शारदाने केला. शेतमजुरी करून तिने आपल्या मुलींचे योग्य संगोपन केले. कोणत्याही संकटात न डगमगता तीनही मुलींना शिकविले. मुलीच तिचे भविष्य होते. या मुलींनाही आपल्या आईच्या कष्टाची जाणीव होती.नुकताच दहावीचा निकाल लागला. त्यात समीक्षाने ९६.२० टक्के गुण घेतले. एका ग्रामीण भागातील आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीने मिळविलेले हे यश सर्वांसाठी आदर्शच आहे. तिला जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे, मुख्याध्यापक मुकुंद पांडे, सरपंच प्रवीण जानकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आता खरी गरज आहे ती समीक्षाच्या उच्च शिक्षणासाठी मदतीची. एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील समीक्षाला उच्च शिक्षणासाठी समाजातील दात्यांनी पुढे यावे, या गुणी मुलीला भविष्य घडविण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा आहे.