यवतमाळ - एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना यवतमाळलगतच्या जवाहरनगर भारी येथे बुधवारी घडली. दोघांनाही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. संतोष संभाजी गाडेकर (३०) रा. जवाहरनगर भारी असे तरुणाचे नाव आहे. त्याचे गावातीलच एका २० वर्षीय तरुणीवर प्रेम आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास या दोघांनीही विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. नेमका हा प्रकार कशातून घडला हे पुढे आले नव्हते. वृत्तलिहिस्तोवर पोलिसात या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नव्हती.
प्रेमीयुगुलाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 20:55 IST