शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने विदर्भातील उसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:23 IST

विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देटंचाईची चिन्हे लागवड घटल्याने उद्योग संकटात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पश्चिम महाराष्ट्रात उसाचे लागवड क्षेत्र ९० टक्केपर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम या भागातील साखर कारखान्यावर होत आहे. मात्र विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.एकेकाळी विदर्भातील साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या भरवशावर चालत होते. आता विरोधाभासी चित्र आहे. आता कारखान्यांची गर्दी असलेल्या भागानेच ऊसाच्या लागवडीकडे पाठ फिरविली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे आज क्षेत्र ९० टक्के घटले आहे. विदर्भातील उसही पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची आवश्यक तेवढी गरज भागवू शकणार नाही. या कारणांमुळे ६० टक्के कारखाने बंद पडण्याचा धोका आहे.विदर्भातील ऊस लागवडीने आज औरंगाबाद विभागालाही मागे टाकले आहे. विदर्भात सहा हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. औरंगाबाद विभागात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचे नियोजन होते. प्रत्यक्षात सहा हजार हेक्टरातच लागवड थांबली. नियोजनाच्या केवळ १० टक्के क्षेत्रातच ही लागवड झाली आहे.कोल्हापूर विभागात दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात लागवड क्षेत्र ३१ हजार हेक्टर आहे. यातही पूर परिस्थितीने ८० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे कोल्हापुरातून कारखान्यांना ऊस मिळणार नाही. पुणे विभागात तीन लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते. आज प्रत्यक्षात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावला गेला. नाशिक विभागात २५ हजार हेक्टर, तर कोकणात २८५ हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले आहे.संपूर्ण राज्यात नऊ लाख चार हजार हेक्टरवर ऊसाची लागवड होते. यावर्षी एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्रातच ऊस उभा आहे. हे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा ९० टक्क्यांने कमी आहे. दहा टक्के उसावर कारखाने चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रयवतमाळ जिल्ह्यात चार हजार २४२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. नागपुरात १५४४ हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला. बुलडाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही ऊस उत्पादकांची संख्या वाढली आहे.धान पट्ट्यातही ऊसउसाला अधिक पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादक पट्ट्यातही ऊस लागवडीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे. याचे मोठे बदल पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाणी टंचाईने उसाची लागवड घटली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने