शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

विद्यार्थ्यांनी अनुभवले ग्रामीण जीवन

By admin | Updated: September 15, 2015 05:19 IST

आधुनिक काळात शहरी मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचाही अपेक्षित परिणाम

यवतमाळ : आधुनिक काळात शहरी मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचाही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. हा धोका ओळखून यवतमाळ पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना थेट ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून दिली. बाभूळगाव तालुक्यातील महमदपूर या आदर्श गावाला भेट देण्यात आली. शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून या शाळेतर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून पॅरेन्टस् कौन्सिलतर्फे वर्ग तीन आणि सहाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. महमदपूर येथे सुभाषचंद्र आचलिया यांनी या गावाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. हे गाव विविध दहा पुरस्कारांनी सन्मानित आहे, ही गौरवाची बाब सांगण्यात आली. ऊस, संत्रा, केळी, सोयाबीन, कापूस आदी पिकांची शेती दाखवून उत्पादन कसे घेतले जाते, त्याची विक्री कोठे केली जाते, शेतकऱ्यांचा यात किती फायदा असतो आदी बाबी सांगण्यात आल्या. शिवाय ग्रामीण भागातील लोकांचा व्यवसाय, त्यांच्या उदरनिर्वाहांची साधने या विषयीची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी दहीहांडीचा कार्यक्रमही या निमित्त घेण्यात आला. यात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद लुटला. या उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेचे समन्वयक यश बोरुंदिया यांचे होते. पॅरेन्टस् कौन्सिलच्या अध्यक्ष सुरूची खरे, सहसचिव साक्षी सिंधी, सदस्य बुरटकर यांचे मोठे योगदान या उपक्रमासाठी लाभले. शाळेच्या छाया गुजर, स्मिता मिश्रा, मंजू साहू, अर्चना निनगुरकर, पूनम देशमुख, विद्या राजगिरे, अमोल क्षीरसागर यांचेही त्यांना सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)